Geekbench वरील लिस्टिंग मधून असे दिसून येते की RMX5108 मध्ये 8GB रॅम आणि Android 15 आहे.
Realme कडून नवी P-series फोन्स भारतामध्ये येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिकृत टीझर मध्ये ‘X,'दिसत आहे पण अन्य कोणतीही ठोस माहिती उघड करण्यात आलेली नाही. दरम्यान हा फोन Realme P4x असू शकतो असे संकेत मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार असे दिसते की ब्रँड त्याच्या Realme P मालिकेचा वेग वाढवत आहे कारण हा फोन नेहमीच्या सायकलपेक्षा आधीच समोर आला आहे. फ्लिपकार्टची एक खास मायक्रोसाईट लाईव्ह झाली आहे, जी भारतात Realme P-सीरीज "X" फोन लाँच करण्याची झलक दाखवते. निश्चितपणे काहीही सांगता येत नसले तरी, सर्व संकेत Realme P4x कडे निर्देश करतात. त्याचा आधीचा Realme P3x, या वर्षाच्या सुरुवातीला भारतात लाँच झाला आहे.
Realme चा हा नवा फोन मॉडेल नंबर RMX5108 सोबत दिसत आहे. जो Geekbench वर दिसला आहे. Geekbench वरील लिस्टिंग मधून फोनच्या अन्य काही महत्त्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहेत.
Geekbench च्या डेटाबेस मधून फोनमध्ये कोणती चीपसेट असेल याची माहिती देण्यात आलेली नाही पण MediaTek chip असेल असे दिसून येत आहे. यामध्ये 2.60GHz वर काम करणारे चार कोर, 2.00GHz वर काम करणारे चार कोर आणि Mali-G615 MC2 ग्राफिक्स समाविष्ट आहेत. या तपशीलांवरून असे दिसून येते की डिव्हाइस Dimensity 7400 द्वारे समर्थित असू शकते. या लिस्टिंगवरून पुढे असे दिसून येते की RMX5108 मध्ये 8GB रॅम आणि Android 15 आहे. दुर्दैवाने, सध्या या डिव्हाइसच्या अंतिम मार्केटिंग नावाबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही.“Guess What's Next?” असे लिहिलेले टीझर या येणार्या टीझर कडे लक्ष वेधून घेत आहे.
आतापर्यंत, Realme P4 सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन्स समाविष्ट आहेत, ते म्हणजे Realme P4 आणि P4 Pro. हे स्मार्टफोन ऑगस्टमध्ये अनुक्रमे 14,999 रुपये आणि 19,999 रुपयांच्या किंमतीसह लाँच झाले होते. कदाचित, पुढील P-सिरीज फोन P4 पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असू शकतो.
Realme चा हा नवीन फोन या महिन्याच्या अखेरीस भारतात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे आणि तो Flipkart द्वारा विकला जाईल. RMX5108 हा या येणाऱ्या Realme P-सिरीज फोनचा मॉडेल नंबर असू शकतो का? याचीही माहिती अद्याप समजू शकलेली नाही त्यामुळे फोनचे पुढील अपडेट्स मिळेपर्यंत ग्राहकांना देखील थोडी वाट पहावी लागणार आहे.
जाहिरात
जाहिरात
Single Papa OTT Release Date: When and Where to Watch Kunal Khemu’s Upcoming Comedy Drama Series?
Diesel Set for OTT Release Date: When and Where to Harish Kalyan's Action Thriller Online?