सॅमसंग व्हिजन एआय कम्पेनियन लाईव्ह टीव्ही, सॅमसंग टीव्ही प्लस किंवा कोणत्याही स्ट्रीमिंग सेवेवरून कंटेंट पाहताना सक्रिय केले जाऊ शकते.
Photo Credit: Samsung
सॅमसंग व्हिजन एआय कम्पेनियन ही बिक्सबीची अपग्रेडेड आवृत्ती आहे
Samsung ने त्यांच्या 2025 च्या टीव्ही लाइनअपमध्ये त्यांचे नवीन Samsung Vision AI Companion आणण्यास सुरुवात केली आहे. बर्लिनमधील Internationale Funkausstellung Berlin (IFA) 2025 मध्ये याआधी घोषित करण्यात आलेले हे फीचर प्रेक्षकांना ऑन-स्क्रीन कंटेंट आणि इतर गोष्टींबद्दल प्रश्न विचारण्याची परवानगी देते. Samsung Vision AI Companion हे One UI Tizen वर तयार केले आहे आणि Bixby द्वारे पॉवर्ड आहे. ते मायक्रोसॉफ्टच्या Copilot आणि Perplexity AI अॅप्ससह प्रगत जनरेटिव्ह एआय टूल्स देखील एकत्रित करते. Samsung Vision AI Companion अनेक भाषांना समर्थन देते.
Samsung ने त्यांच्या न्यूजरूम पोस्टद्वारे पुष्टी केली की Vision AI Companion त्यांच्या 2025 लाइनअपमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये Neo QLED, Micro RGB, OLED, QLED step-up TVs, Smart Monitors,आणि Movingstyle यांचा समावेश आहे. एआय बेस्ड प्लॅटफॉर्म वन यूआय टिझेनवर तयार केला आहे आणि सात वर्षांसाठी ओएस सॉफ्टवेअर अपग्रेड मिळण्याची खात्री आहे.
जनरेटिव्ह एआय द्वारे, व्हिजन एआय कम्पेनियन हे बिक्सबीचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. हे यूजर्सना प्रश्न विचारण्याची, कस्टमाइज्ड शिफारसी प्राप्त करण्याची आणि व्हॉइस कमांडसह कामं मॅनेज करण्याची परवानगी देते. रिमोट कंट्रोलवरील एआय बटणावरून ते अॅक्सेस करता येते. हे एआय अॅप्समध्ये अॅक्सेस देते आणि वैयक्तिकृत शिफारसी, ट्रिप प्लॅनिंग आणि प्रोडक्ट रिव्ह्यू देते.
सॅमसंग व्हिजन एआय कम्पेनियन लाईव्ह टीव्ही, सॅमसंग टीव्ही प्लस किंवा कोणत्याही स्ट्रीमिंग सेवेवरून कंटेंट पाहताना सक्रिय केले जाऊ शकते. यूजर्स सध्या जे पाहत आहेत ते न सोडता व्हिज्युअल आणि संबंधित कंटेंटसह त्यांच्या प्रश्नांची पटापट उत्तरे मिळवू शकतात. सॅमसंग व्हिजन एआय कम्पेनियन कोरियन, इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन आणि पोर्तुगीज अशा 10 भाषांना सपोर्ट करते. हे Copilot आणि Perplexity ला एकत्र करते.
हे लाईव्ह ट्रान्सलेट फीचरला सपोर्ट करते, ज्यामुळे ऑनस्क्रीन संवाद आणि संभाषणांचे रिअल-टाइम भाषांतर शक्य होते आणि चित्र आणि ध्वनीच्या एआय पॉवर्ड ऑप्टिमायझेशनसाठी एआय गेमिंग मोड देखील उपलब्ध आहे. शिवाय, ते जनरेटिव्ह वॉलपेपर आणि सॅमसंगची इतर एआय फीचर्स देते, ज्यात एआय पिक्चर, एव्हीए प्रो आणि एआय अपस्केलिंग प्रो यांचा समावेश आहे.
जाहिरात
जाहिरात