Photo Credit: Amazon
महाराष्ट्रात आत्ताच गणेशोत्सवाला सुरुवात झाली असली तरी आगामी सण म्हणजेच नवरात्री आणि दिवाळी या सणांचे औचित्य साधून Amazon घेऊन येत आहे Amazon Great Indian Festival 2024 लवकरच सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरवर्षी प्रमाणे या सणांचे औचित्य साधून Amazon ने हा फेस्टिवल सेल 20 सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. हा सेल सुरू होण्यासाठी आता फक्त एक आठवड्याचा कालावधी बाकी असतानाच Amazon कडून या सेलमध्ये स्मार्टफोन्स सोबतच विविध प्रकारच्या उपकरणांवर देखील भारी सवलत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यासोबतच Amazon कंपनीने Amazon Great Indian Festival 2024 मध्ये काही विशिष्ट स्मार्टफोनवर खास सवलत देण्याचे ठरवले आहे. ज्यामध्ये OnePlus 11R, OnePlus 12, OnePlus 12R, OnePlus Nord CE 4 Lite, OnePlus Nord CE 4 सोबतच Realme चे Realme Narzo 70 Pro आणि Realme GT 6T यावर सवलत देण्यात येणार आहे.
iQOO Z9s Pro, iQOO Z9, iQOO Z9 Lite, iQOO Neo 9 Pro, iQOO 12 आणि Samsung च्या Galaxy S24 Ultra, Galaxy M15 आणि बऱ्याच स्मार्टफोन्स वर सूट मिळणार आहे. एवढेच नव्हे तर Xiaomi, Redmi, Vivo, Tecno आणि Oppo सारख्या विविध प्रकारच्या ब्रँड्स च्या मोबाईलवर सुध्दा Amazon Great Indian Festival 2024 मध्ये भारी सवलत देण्यात येणार आहे.
स्मार्टफोन्स व्यतिरिक्त स्मार्टफोन्स ॲक्सेसरीज वर 80 % ची तर लॅपटॉप्स वर 40 टक्क्या पर्यंतची सूट देण्यात येणार आहे. Boat सारखा ब्रँड सुध्दा आपल्या गॅजेट्स वर भारी सवलत ऑफर करत आहे. वायरलेस TWS इयरफोन जसे की OnePlus Nord Buds 2r, Sony C700 आणि अन्य काही Amazon Great Indian Festival 2024 सेल इव्हेंट मध्ये दरम्यान सवलतीत मिळेल. पॉवर बँक, चार्जर, चार्जिंग केबल्स आणि यांसारखी बरीच उपकरणे देखील सवलतीवर खरेदी करण्यासाठी उपलब्ध असतील.
Amazon Great Indian Festival 2024 मध्ये Amazon Prime सदस्यांना इतर सदस्यांच्या तुलनेत एक दिवस आधी प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे. काही निवडक बँकांच्या क्रेडिट कार्ड सोबतच, Amazon Pay Later आणि अन्य UPI माध्यमांचा वापर करून विशेष सवलती सुध्दा प्राप्त होऊ शकतात
जाहिरात
जाहिरात