Photo Credit: Poco
अमेझॉन या ई कॉमर्स वेबसाईट वर 26 सप्टेंबर पासून Amazon Prime members आणि 27 सप्टेंबर पासून अन्य सार्या ग्राहकांसाठी सेल सुरू झाला आहे. या सेल मध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू दमदार ऑफर्स मध्ये विकत घेता येणार आहे. यामध्ये अगदी स्मार्टफोन्सपासून टॅबलेट, लॅपटॉप, होम अपलायंसेस, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट वॉचचा देखील समावेश आहे. स्मार्टफोन या अमेझॉनच्या डील्स मध्ये अगदी 40% सलवलतीच्या दरातही मिळू शकणार आहे.
अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल ऑफर मध्ये सगळ्यात आकर्षक ऑफर ही आयफोन वर आहे. iPhone 13, आता ग्राहकांना या अमेझॉन डील मध्ये अवघ्या 40,499 रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे. ही किंमत सगळ्या ऑफर्सचा फायदा घेतल्यानंतर लागू होत आहे. पण बजेट फोन घेण्याच्या विचारात असाल तर 20 हजारांपेक्षा कमी रूपयांमध्ये पहा तुम्हांला कोणकोणते स्मार्टफोन विकत घेण्याचा पर्याय आहे. यामध्ये तुम्ही अगदी iQOO, Realme, OnePlus, ते Samsung चा स्मार्टफोन विकत घेऊ शकता.
ग्राहकांना खरेदी करताना जर ते SBI Debit/Credit card वापरू शकले तर तांना 10% तात्काळ सूट मिळू शकते. त्यामुळे 29,750 रूपयांपर्यंत ग्राहकांना फायदा मिळवता येऊ शकतो. ज्यांना पूर्ण पैसे देऊन वस्तू घेणं शक्य नाही त्यांच्यासाठी नो कॉस्ट ईएमआय चा देखील पर्याय असणार आहे. मात्र त्यासाठी अटींची पूर्ता करावी लागणार आहे. credit cards, Bajaj Finserv, Amazon Pay Later, enabling चा वापर केल्यास सुमारे 24 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट इएमआयचा पर्याय मिळणार आहे.
OnePlus Nord CE 4 Lite 5G, या स्मार्टफोनवर देखील ऑफर आहे. या सेल मध्ये 20,999 चा हा फोन 16,999 रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे. यासोबत 1299 चे OnePlus Bullet Z2 देखील मोफत मिळणार आहेत.
फोन्सची यादी मूळ किंमत अमेझॉनच्या सेल मधील किंमत
OnePlus Nord CE 4 Lite 5G Rs. 20,999 Rs. 16,999
iQOO Z9s 5G Rs. 25,999 Rs. 19,998
Samsung Galaxy M55s 5G Rs. 28,999 Rs. 17,999
Redmi Note 13 Rs. 20,999 Rs. 14,999
Poco X6 Neo 5G Rs. 19,999 Rs. 11,749
Realme Narzo 70 Turbo 5G Rs. 19,999 Rs. 14,999
iQOO Z7 Pro 5G Rs. 26,999 Rs. 19,749
जाहिरात
जाहिरात