Acer चा दमदार Nitro Lite 16 भारतात लॉन्च, 70 हजारात मिळणार नवा गेमिंग बीस्ट

Acer Nitro Lite 16 आता भारतात अधिकृतपणे उपलब्ध करण्यात आला आहे. i5 मॉडेलसाठी 69,999 रूपये आणि i7 व्हेरिएंटसाठी 89,999 रूपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.

Acer चा दमदार Nitro Lite 16 भारतात लॉन्च, 70 हजारात मिळणार नवा गेमिंग बीस्ट

Photo Credit: Acer

एसर नायट्रो लाइट १६ मध्ये हायलाइट केलेल्या WASD कीज आहेत

महत्वाचे मुद्दे
  • Acer Nitro Lite 16: AI Copilot की व DLSS 3 टेक्नॉलॉजी
  • Acer च्या नव्या लॅपटॉप मध्ये 165Hz डिस्प्ले आणि RTX 4050 GPU
  • लॅपटॉपचं वजन सुमारे 1.95 किलो आहे त्याची जाडी 22.9mm आहे
जाहिरात

Acer कडून त्यांच्या Lite Series मधील लॅपटॉप्स मध्ये Nitro Lite 16 laptop या नव्या डिवाईस चा समावेश करणार आहे. भारतात आता लवकरच Nitro Lite 16 laptop लॉन्च होणार आहे. हा लॅपटॉप गेमर्स, विद्यार्थी, कंटेट क्रिएटर्स यांच्यासाठी खास असणार आहे. लाईट सीरीज मधील हा नवा लॅपटॉप परफॉर्ममन्स आणि पोर्टेबिलीटी यांचा उत्तम मेळ राखणार आहे. मग हा Acer च्या नव्या लॅपटॉप मध्ये काय असतील खास फीचर्स?Acer च्या Nitro Lite 16 मध्ये 16-inch WUXGA (1920x1200) IPS display आहे. तर लॅपटॉपचा 16:10 aspect ratio आहे. हा लॅपटॉप 180Hz refresh rate ला सपोर्ट करतो तर 100% sRGB colour coverage देतो. या लॅपटॉप मध्ये built-in webcam आहे. सोबत प्रायव्हसी शटर आहे. हा लॅपटॉप Pearl White chassis आणि Nitro branding सह येणार आहे.

Nitro Lite 16 मध्ये 13th Gen Intel Core i7-13620H processor आहे जो NVIDIA GeForce RTX 4050 Laptop GPU सोबत जोडलेला आहे. हा लॅपटॉप DLSS 3, ray tracing ला सपोर्ट करतो. MUX switch आहे जो graphics switching करण्यास मदत करतो. लॅपटॉप मधील मेमरी 24GB DDR5 RAM,पर्यंत जाईल तर स्टोरेज 1TB PCIe Gen 4 SSD आहे.

Nitro Lite 16 हा हायलाइट केलेल्या WASD कीसह पांढऱ्या बॅकलिट कीबोर्डने सुसज्ज आहे. Windows 11 वर AI tools अ‍ॅक्सेस करण्यासाठी यात एक खास Copilot key देखील समाविष्ट आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi 6, Bluetooth 5.0 or higher, Gigabit Ethernet, HDMI 2.1, USB-C, आणि USB 3.2 Gen 2 ports with power-off charging support असणार आहे. लॅपटॉपचं वजन सुमारे 1.95 किलो आहे त्याची जाडी 22.9 मीमी आहे. यामध्ये 53 Wh battery आणि 100W USB-C power adapter आहे. हा लॅपटॉप इंटेल थ्रेड डायरेक्टर वर चालतो. यामध्ये मल्टीटास्किंग, गेमिंग आणि क्रिएटीव्ह कामं केली जातात.

Acer च्या Nitro Lite 16 ची किंमत आणि कुठे करू शकाल खरेदी?

Acer Nitro Lite 16 ची किंमत 69,999 रूपयांपासून पुढे सुरू होते. हे Acer च्या एक्सक्लुझिव्ह रिटेल स्टोअर्स, Acer ऑनलाइन स्टोअर तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वर देखील खरेदीसाठी उपलब्ध असेल.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. लॉन्चपूर्वीच Lava Shark 2 च्या डिस्प्लेचे स्पेसिफिकेशन्स झाले जाहीर; इथे घ्या जाणून
  2. HMD Touch 4G मध्ये 3.2-इंच डिस्प्ले, Unisoc T107 प्रोसेसर; इथे पहा स्पेसिफिकेशन्स
  3. Amazon Sale 2025 मध्ये Acer, Dell, HP गेमिंग लॅपटॉप्सवर भन्नाट डील्स
  4. OnePlus 15s होणार Snapdragon 8 Elite Gen 5 आणि 100W फास्ट चार्जिंगसह लॉन्च
  5. दमदार कॅमेरा आणि बॅटरी सह आला Vivo चा स्टायलिश Vivo V60e
  6. 50MP triple rear camera सह पहा कोणती खास फीचर्स असणार Samsung Galaxy M17 5G मध्ये
  7. टॉप ब्रँडच्या इलेक्ट्रिक टूथब्रशवर Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये मोठ्या ऑफर्स
  8. iQOO Neo 11 लवकरच लॉन्च होण्याची शक्यता; समोर आली दमदार फीचर्सची माहिती
  9. OnePlus 15 मध्ये मिळणार पॉवरफुल परफॉर्मन्स आणि नवं डिझाईन; इथे पहा अपडेट्स
  10. Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये GPS Kids Smartwatch वर 70% पर्यंत सूट मिळणार
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »