Amazon नो-कॉस्ट ईएमआय प्लॅन आणि coupon discounts देखील देत आहे, ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त बचत करण्यास मदत होऊ शकते.
Photo Credit: Amazon
अमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल २०२५ ३१ जुलै रोजी सुरू झाला
अमेझॉनचा The Great Freedom Festival 2025 सुरू झाला आहे. या ऑनलाईन सेल मध्ये लॅपटॉपवरही मोठी सूट जाहीर करण्यात आली आहे. तुम्हाला तुमचा लॅपटॉप अपग्रेड करायचा असेल तर या सेल मध्ये तो विकत घेण्याची उत्तम संधी आहे. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधत जाहीर केलेल्या या सेल दरम्यान दमदार डील्स लागू करून पॉवरफूल लॅपटॉप आणि प्रीमियम कॉन्फिगरेशनवर मोठी सूट मिळवता येऊ शकते. या सेल दरम्यान, तुम्ही तुमच्या मागणीनुसार पॉवर आणि फीचर्स सह प्रीमियम लॅपटॉपवर 37% पर्यंत सूट मिळवू शकता. ग्रेट फ्रीडम सेल तुमच्यासाठी हाय परफॉर्मिंग असलेला i9 लॅपटॉप घेण्याची संधी घेऊन येत आहे जो तुमची प्रोडक्टीव्हिटी देखील वाढवेल.
तुमच्या लॅपटॉपच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही खास बँक ऑफर्स, अतिरिक्त एक्सचेंज ऑफर्स आणि EMI पर्यायांसह लॅपटॉप खरेदी करता येतील. तुम्ही प्राइम मेंबर असाल तर faster shipping आणि exclusive deals आहेत.
एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट ईएमआय प्लॅन आणि coupon discounts चा या ऑफर्स मध्ये समावेश आहे. एसबीआय कार्डधारकांना 10 टक्क्यांपर्यंत instant discount (5250 रुपयांच्या मर्यादेसह) मिळू शकते. अमेझॉन पे आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड यूजर्सना 5 टक्के कॅशबॅक मिळू शकते. काही निवडक वस्तू कॅश-ऑन-डिलिव्हरी मध्येही मिळणार आहेत. अमेझॉन पे यूपीआय यूजर्स पेमेंटवर 5 टक्के कॅशबॅक मिळवू शकतात.
HP, Dell, Lenevo चे i9 लॅपटॉप्स तुम्हांला 22,000 ते 26,000 च्या रेंज मध्ये विकत घेता येऊ शकता. Intel i9 असलेले लॅपटॉप दर्जेदार कामगिरीमध्ये उत्तम आहेत. हाय मल्टीटास्किंग, व्हिडिओ गेमप्ले, व्हिडिओ एडिटिंग, प्रोफेशनल वर्क इत्यादींमध्ये खूप चांगले आहेत. या प्रीमियम डिव्हाइसेसवर सुमारे 37 % सूट आहे हे लक्षात घेता, हाय क्वॅलिटीच्या i9 मशीन्स सरासरी किमतींपेक्षा खूपच कमी आहेत.
प्रोडक्टचं नाव | एमआरपी | सेल मधील किंमत |
---|---|---|
HP 15 (13th Gen Intel Core i5-1334U 16GB DDR4,512GB SSD) | Rs. 72,111 | Rs. 45,240 |
Lenovo IdeaPad Slim 3 (13th Gen Intel Core i7-13620H) | Rs. 89,390 | Rs. 55,240 |
Acer Aspire Lite (AMD Ryzen 5-5625U) | Rs. 58,999 | Rs. 30,490 |
HP 15 (13th Gen Intel Core i5-1334U 16GB DDR4, 1TB SSD) | Rs. 78,112 | Rs. 51,490 |
Lenovo IdeaPad Slim 3 (Ryzen 5 5625U) | Rs. 59,090 | Rs. 35,740 |
Asus Vivobook 15 (13th Gen Intel Core i7-13620H) 55,740 | Rs. 85,990 | Rs. 55,740 |
Dell Inspiron 3530 (13th Gen Intel Core i5-1334U) | Rs. 73,163 | Rs. 50,990 |
जाहिरात
जाहिरात