M5 MacBook Pro सर्वात आधी लॉन्च होण्याचा अंदाज आहे. ज्यात प्रो आणि मॅक्स असे दोन कॉन्फ्युगरेशन असू शकतात.
Photo Credit: Apple
टीझरमध्ये मॅकबूक साईड प्रोफाइल दिसतो, निळ्या रंगाचा अंदाज आहे
Apple कडून नव्या मोठ्या प्रोडक्टच्या लॉन्चची घोषणा होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.सध्या हे सारे संकेत नवे प्रोडक्ट M5-powered MacBook Pro असल्याचे सूचवत आहे. Apple चे Senior Vice President of Marketing, Greg Joswiak यांनी सोशल मीडीया प्लॅटफॉर्म X (formerly Twitter) वर पोस्ट करत “Something powerful is coming.” असं म्हटल्यानंतर आता ही चर्चा सुरू झाली आहे.पोस्टसोबत एक छोटासा टीझर ग्राफिक होता जो रहस्यमय असला तरी, कल्पनाशक्तीला फारसा वाव देत नव्हता, ज्यामध्ये मॅकबुक प्रोचे साइड प्रोफाइल दिसत आहे. अॅपचे टीझर क्वचितच रॅडम असतात आताच्या टीझर मध्येही हिंट आहे. प्रेक्षकांना सहज हा मॅकबूक असल्याचा अंदाज येत आहे. हा निळ्या रंगात दिसत आहे. हा व्हेरिएंट MacBook Air आणि iPhone Air प्रमाणे असेल.
टीझरमध्ये लॅपटॉपची "V-आकाराची" रचना अधिक उल्लेखनीय आहे, जी रोमन अंक V ला एक संकेत म्हणून मोठा अर्थ देत आहेत. बहुप्रतिक्षित M5 चिपचा देखील यामधून संदेश मिळत आहे. या अनुमानात भर घालत, Joswiak च्या कॅप्शन, "Mmmmm" मध्ये पाच 'M' आहेत, जे बरेच चाहते M5 प्रोसेसरची एक प्लेफूल पुष्टी म्हणून पाहत आहेत.
Bloomberg सह Apple insiders च्या रिपोर्ट्सनुसार, कंपनी एक लाइनअप रिफ्रेश तयार करत आहे ज्यामध्ये M5 मॅकबुक प्रो, एक नवीन आयपॅड प्रो आणि कदाचित Apple Vision Pro चे अपडेट असू शकते. M5 MacBook Pro सर्वात आधी लॉन्च होण्याचा अंदाज आहे. ज्यात प्रो आणि मॅक्स असे दोन कॉन्फ्युगरेशन असू शकतात. नव्या वर्षाच्या सुरूवातीला ते येऊ शकतात. नव्या चीप मुळे परफॉर्ममन्स स्पीड अप होणार आहे. अधिक एनर्जी वापरता येईल आणि एआय क्षमता देखील सुधारलेली असेल.
दरम्यान माहिती खरी ठरल्यास, M5 वर चालणारा हा मॅकबुक प्रो 2025 मधील अॅपलच्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट्सपैकी एक असेल, जो इंटेल-युगातील हार्डवेअरपासून स्वतःच्या अॅपल सिलिकॉन इकोसिस्टमकडे कंपनीच्या सततच्या वाटचालीला पुढे नेईल. सध्या तरी, टीझरने अॅपलच्या हेतूप्रमाणेच काम केले आहे, इंटरनेटवर तो चर्चेत आला आहे. जर "पाच एम" चा अर्थ आपल्याला जे वाटते तेच असेल, तर आपण अॅपलचा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली मॅकबुक पाहण्यापासून काही दिवसच दूर असू शकतो.
जाहिरात
जाहिरात