Zephyrus G16, TUF A14, ProArt PX13, Zenbook S16, Vivobook S14 ची किंमत आणि वैशिष्ट्ये

ASUS चे नवीन लॅपटॉप्स हे खरेदीसाठी ASUS च्या स्टोअर्स मध्ये LFR, Croma आणि eShop व्यतिरिक्त Flipcart आणि Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

Zephyrus G16, TUF A14, ProArt PX13, Zenbook S16, Vivobook S14 ची किंमत आणि वैशिष्ट्ये

Photo Credit: Gadgets 360

महत्वाचे मुद्दे
  • ASUS ROG Zephyrus G16 हा Nvidia GeForce RTX 4070 GPU ने सुसज्ज
  • हे पाचही लॅपटॉप्स Ryzen AI 9 HX 370 APU ने समर्थित
  • ASUS Zenbook S16, Zenbook S14 मध्ये 120Hz ची OLED स्क्रीन
जाहिरात

मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी ASUS या कंपनीने आपले पाच नवीन लॅपटॉप भारतात लॉन्च केले आहेत. जे सध्याच्या प्रगत AI प्रणाली सोबतच AMD's Zen 5 'Strix Point' Ryzen APU या वैशिष्ट्यांनी समर्थित आहेत. नव्याने लॉन्च झालेले लॅपटॉप्स हे विशेष करून सामान्य वापरकर्ते, गेमर्स आणि क्रियेटर्सच्या तांत्रिक आवश्यकता लक्षात ठेऊन बनविण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया हे पाच लॅपटॉप कोणते आहेत? आणि त्यासोबतच त्यांची किंमत आणि वैशिष्ट्ये काय आहेत?

ASUS च्या नवीन लॅपटॉप्सची नावे अणि किंमत

ASUS च्या Zephyrus G16 या लॅपटॉपच्या GA605WI-QR067WS या प्रकाराची किंमत 2,49,990 रुपये इतकी असून दुसरा प्रकार म्हणजे GA605WV-QP078WS 1,94,990 रुपये इतकी आहे.

ASUS TUF Gaming A14 या प्रकाराची FA401WV-RG037WS किंमत 1,69,990 इतकी आहे.

ASUS ProArt PX13 या लॅपटॉपची किंमत 1,79,990 रुपये असून Zenbook S 16 OLED हा लॅपटॉप 1,49,990 रुपयांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Vivobook S 14 OLED च्या दोन्ही प्रकारांची M5406WA-PP962WS आणि M5406WA-PP961WS किंमत 1,24,990 आहे. हे पाचही लॅपटॉप खरेदीसाठी ASUS च्या स्टोअर मध्ये, LFR, Croma आणि eShop व्यतिरिक्त Flipcart आणि Amazon वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

ASUS च्या नवीन लॅपटॉप्सची वैशिष्ट्ये

ASUS ROG Zephyrus G16

ASUS ROG Zephyrus G16 हा लॅपटॉप क्रियेटर्स आणि गेमर्ससाठी डिझाइन करण्यात आला आहे. हा AMD Ryzen AI 9 HX 370 प्रोसेसरने समर्थित असून NVIDIA GeForce RTX 4070 GPU ग्राफिक्सचे समर्थन करतो. या लॅपटॉपचा 16 इंचाचा OLED डिस्प्ले QHD+ आणि 240Hz रिफ्रेश रेट सोबत ROG नेब्युला पॅनेल 0.2ms प्रतिसाद वेळ आणि 500 nits तेजस्विता प्रदान करतो. हा लॅपटॉप त्याच्या पूर्ववर्ती पेक्षा 25% पातळ आहे, प्रीमियम ॲल्युमिनियम CNC युनिबॉडीसह बनविण्यात आला आहे ज्याचे वजन 1.85 किलोग्रॅम आहे. यामध्ये 90Wh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून Wi-Fi 7 चे समर्थन करतो आणि यामध्ये DP 2.1 सह 40Gbps USB 4 Type-C पोर्ट आणि UHS-II SD कार्ड रीडर देखील आहे.

ASUS TUF Gaming A14

ASUS TUF Gaming A14 हा AMD Ryzen AI 9 HX 370 या प्रोसेसरद्वारे समर्थित असून एक कॉम्पॅक्ट 14 इंचाचा गेमिंग लॅपटॉप आहे. यात चार Zen5 आणि आठ Zen5C कोर आहेत जे एकत्रित 12 कोर आणि 24 थ्रेड्स, 5.1 GHz पर्यंत क्लॉक केलेले आहेत. यामध्ये एकात्मिक Radeon 890M iGPU आणि Nvidia GeForce RTX 4060 साठी 110W च्या कमाल TGP चा पर्याय समाविष्ट आहे. लॅपटॉप 7500MHz वर 32GB पर्यंत LPDDR5X मेमरी आणि M.2 Gen 4 SSD स्टोरेजच्या 2TB पर्यंत समर्थन करतो. या लॅपटॉपच्या बॅटरी 73Wh क्षमतेची असून 30 मिनिटांत 50% जलद चार्जिंग आणि 100W टाइप सी चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीमध्ये Wi-Fi 6E, डिस्प्लेपोर्टसह ड्युअल USB टाइप-सी पोर्ट आणि Nvidia Advanced Optimus सोबतच MUX बटन देण्यात आले आहे.

ASUS ProArt PX13

ASUS ProArt PX13 हा लॅपटॉप व्यावसायिकांसाठी बनविण्यात आला असून याचे वजन 1.38 किलो आहे आणि तो 15.8 मिमी इतका पातळ आहे. यामध्ये 13 इंचाचा डिस्प्ले ASUS Lumina OLED टचस्क्रीन देण्यात आला आहे. यामध्ये 100% DCI-P3 कलर गॅमट आणि Pantone प्रमाणीकरण सुध्दा आहे. या लॅपटॉपमध्ये 95W TGP सह NVIDIA GeForce RTX 4050 GPU समाविष्ट आहे. हा लॅपटॉप सामग्री निर्मिती आणि उत्पादकता वाढविण्यासाठी MuseTree आणि StoryCube सारखे AI प्रणाली वर चालणारे सॉफ्टवेअर प्रदान करतो.

ASUS Zenbook S 16 OLED

ASUS Zenbook S 16 OLED हा स्लिम डिझाइनमध्ये AI कार्यप्रदर्शन वैशिष्ट्यीकृत करणारा लॅपटॉप आहे. या लॅपटॉपच्या वजन 1.5 किलोग्रॅम असून Ryzen AI 9 HX 370 या प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. यात 32GB LPDDR5X-7500 मेमरी आणि 1TB PCIe 4.0 NVMe SSD देखील समाविष्ट करण्यात आला आहे. याचा डिस्प्ले 16 इंचाचा असून 3K रेजोल्युशन सोबत 120Hz रिफ्रेश दर ASUS Lumina OLED डिस्प्लेमध्ये बसविण्यात आला आहे. या लॅपटॉप ची बॅटरी 18 तासांपर्यंत चालते.

ASUS Vivobook S 14 OLED

ASUS Vivobook S 14 OOLED हा उच्च कार्यक्षमतेसोबत एक आकर्षक डिझाइन मध्ये यात 14 इंचाचा 120Hz रीफ्रेश दर असलेला 3K रेजोल्यूशन सोबत ASUS Lumina OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या लॅपटॉपला Pantone प्रमाणीकरण सुध्दा प्राप्त आहे. लॅपटॉप 1.39 सेमी पातळ असून 1.3 किलो वजनाचा आहे. सोबतच AMD Ryzen AI 9 HX 370 प्रोसेसर आणि 50 TOPS XDNA2 NPU, 24 GB LPDDR5X रॅम आणि 512 GB PCIe Gen 4 SSD ने समर्थित आहे. ASUS IceCool थर्मल टेक्नॉलॉजी सातत्यपूर्ण कामगिरी सोबतच यामध्ये बॅकलिट कीबोर्ड आणि मोठा टचपॅड यांचा समावेश आहे.
 

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Xiaomi 17 Ultra मध्ये मिळू शकतो 200MP झूम कॅमेरा आणि 50MP मुख्य सेन्सर – रिपोर्ट
  2. OnePlus 15 मध्ये मिळणार 7,300mAh ची बॅटरी, Snapdragon 8 Elite Gen 5 चा दमदार परफॉर्मन्स
  3. Moto X70 Air भारतात लवकरच दाखल होणार? पाहा खास फीचर्स, किंमतीचे अंदाज
  4. Snapdragon 8 Elite SoC आणि 165Hz डिस्प्लेसह OnePlus Ace 6 झाला अधिकृत; पहा किंमत काय?
  5. Vivo X300 सिरीज भारतात लॉन्च होणार? Zeiss टेलिफोटो एक्स्टेंडर किट्ससह येण्याची शक्यता
  6. Vivo च्या आगामी S50 सिरीजमधील मूळ फीचर्स आले समोर, नोव्हेंबर महिन्यात होणार लॉन्च
  7. HMD Fusion 2 ची लीक झाली स्पेसिफिकेशन्स; फोनमध्ये असणार Snapdragon 6s Gen 4, 120 Hz डिस्प्ले, Smart Outfits Gen 2
  8. Nothing Phone 3a Lite 5G Geekbench लीकमध्ये समोर; पहा काय आहेत फीचर्स
  9. iQOO चाहत्यांसाठी खुशखबर! 27 नोव्हेंबरला येतोय iQOO 15 दमदार फीचर्स सह
  10. OnePlus 15 आणि Ace 6 फ्लॅगशिप स्मार्टफोन च्या किंमती झाल्या लीक
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »