RGB बॅकलिट की आणि मेटल पॅनेलसह येणारा HP GK400F मेकॅनिकल कीबोर्ड 1,599 रुपयांना खरेदी करू शकतात
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल २०२५ मध्ये अनेक ब्रँडच्या मेकॅनिकल कीबोर्डवर सूट मिळत आहे
Amazon Great Indian Festival Sale 2025 हा सध्या तुमच्या पीसी आणि त्याच्याशी निगडीत अन्य उपकरणांना अपग्रेड करण्यासाठीची उत्तम संधी आहे. या सेलमध्ये अमेझॉन कडून मोठ्या ऑफर्स करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वायरलेस माऊस पासून हेडफोन्स इंक जेट प्रिंटर्स, मेकॅनिकल की बोर्ड अपग्रेड करता येऊ शकतात. यामधील लोकप्रिय प्रोडक्ट म्हणजे मेकॅनिकल कीबोर्ड. जर तुम्ही बराच वेळ टाइपिंग करण्यात घालवत असाल, मग ते कोडिंग असो, लेखन असो, गेमिंग असो किंवा घरून काम असो, तर मेकॅनिकल कीबोर्ड खूप फरक करू शकतो. HP, Aula आणि Redragon सारख्या ब्रँडच्या डिव्हाइसेसवर या सेलमध्ये सर्वोत्तम डील आहेत.
नेहमीच्या membrane keyboards पेक्षा, मेकॅनिकल कीबोर्डमध्ये प्रत्येक कीखाली स्वतंत्र स्विच असतो, जे प्रत्येक प्रेससह जास्त वेळ आणि अधिक "क्लिक" की ट्रॅव्हलसह येतात. यामुळे ते तासनतास टाइप करणार्यांना आणि अचूक इनपुटची आवश्यकता असलेल्या गेमर्सना आकर्षक बनतात. त्यांचा टिकाऊपणा आणि प्रतिसादक्षमता देखील स्टॅन्डर्ड कीबोर्डपेक्षा जास्त आहे. परफॉर्ममन्स देखील चांगला असल्याने टायपिंगचा अनुभव सुधारतो आणि अन्य चूका होण्याचे प्रमाणही कमी असते.
Amazon Great Indian Festival sale 2025 दरम्यान, ग्राहकांना RGB बॅकलिट की आणि मेटल पॅनेलसह येणारा HP GK400F मेकॅनिकल कीबोर्ड 1,599 रुपयांना खरेदी करू शकतात. त्यापेक्षा महागड्या किबोर्डमध्ये, 1,000Hz पोलिंग रेट आणि 4,000mAh बॅटरी असलेला Keychron K2 Max ची किंमत 13,999 रुपये आहे. SBI क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असलेल्या ग्राहकांना व्यवहारांसाठी कार्ड वापरताना आणखी 10 टक्के सूट देखील मिळू शकते.
मॉडेल | लिस्ट प्राईज | सेल मधील किंमत |
HP GK400F | Rs. 2,499 | Rs. 1,599 |
Keychron K2 Max | Rs. 28,199 | Rs. 13,999 |
Aula F75 | Rs. 15,999 | Rs. 5,688 |
Redragon K617 | Rs. 3,499 | Rs. 2,289 |
Kreo Hive 65 | Rs. 4,999 | Rs. 2,399 |
EvoFox Katana X2 FS | Rs. 3,499 | Rs. 1,749 |
अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 2025 च्या या कीबोर्ड डीलसह तुमचा टायपिंग अनुभव अपग्रेड करा, आता 70 टक्के पर्यंत सूट उपलब्ध आहे. क्लटर-फ्री डेस्कसाठी वायरलेस मॉडेल्स, अचूक नियंत्रणासाठी मेकॅनिकल कीबोर्ड किंवा सोप्या पोर्टेबिलिटीसाठी कॉम्पॅक्ट पर्यायांमधून तुमचा कीबोर्ड निवडा.
जाहिरात
जाहिरात