Intel 13th Gen i5-13420H आणि NVIDIA GeForce RTX 3050 सह MSI Thin 15 ची किंमत 82,990 रुपयांवरून 51,240 रुपयांना उपलब्ध आहे.
Photo Credit: HP
એમેઝોન સેલ 2025: AMD Ryzen 7 સાથે HP Victus ની કિંમત રૂ. 62,240 છે, જે રૂ. 84,838 થી ઘટીને રૂ
Amazon Great Indian Festival Sale 2025 ची भारतात 23 सप्टेंबर पासून सुरूवात झाली आहे. आता हा सेल सोमवार 6 ऑक्टोबर पासून Amazon Great Indian Festival Diwali Special Sale झाला आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर या सेलमध्ये अनेक गोष्टींवर सूट जाहीर करण्यात आली आहे. ग्राहकांना या सेलमध्ये गेमिंग लॅपटॉप्स वर देखील सूट मिळणार आहे. त्यामध्ये बिगिनर्स साठीच्या मॉडेल्सचा देखील समावेश आहे. या सेलमध्ये ग्राहकांना अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सूट देण्यात आली आहे ज्यामध्ये लॅपटॉप्स, टॅबलेट्स आणि स्मार्टवॉचेसचा समावेश आहे.
Amazon Great Indian Festival Diwali Special Sale मध्येही अनेक सवलतींचा लाभ घेत खरेदी करता येऊ शकते. त्यामध्ये काही बॅंक कार्ड होल्डर्सना सवलतींचा फायदा घेता येणार आहे. Axis Bank, Bobcard, IDFC First Bank, आणि RBL Bank credit cards धारकांना 10% पर्यंत इंस्टंट सूट मिळणार आहे. त्यामध्ये बोनस ऑफर्सचा समावेश असून ग्राहकांना 65 हजारांची सूट विविध व्यवहारांवर मिळवता येऊ शकते. ही खास ऑफर 6 ऑक्टोबरच्या रात्री सुरू झाली असून 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू असणार आहे. ग्राहकांना यामध्ये एक्सचेंज ऑफर, ईएमआयचा पर्याय आणि एक्सक्लुझिव्ह कूपनचा देखील लाभ घेता येणार आहे ज्यामुळे किंमती आणखी कमी होतात.
Amazon Great Indian Festival Diwali Special Sale दरम्यान बिगिनर्ससाठी उपलब्ध असलेल्या काही गेमिंग लॅपटॉप डील्स पहा. Intel 13th Gen i5-13420H आणि NVIDIA GeForce RTX 3050 सह MSI Thin 15 ची किंमत 82,990 रुपयांवरून 51,240 रुपयांना उपलब्ध आहे. Lenovo LOQ 2024 ची किंमत 96,590 रुपयांवरून 61,240 रुपयांना उपलब्ध आहे.
प्रोडक्ट्स | एमआरपी | सेल मधील किंमत |
MSI Thin 15, Intel 13th Gen. i5-13420H, NVIDIA GeForce RTX 3050 | Rs. 82,990 | Rs. 51,240 |
Lenovo LOQ 2024 12th Gen Intel Core I5-12450HX, NVIDIA RTX 3050 | Rs. 96,590 | Rs. 61,240 |
HP Victus, AMD Ryzen 7 7445HS, RTX 3050 | Rs. 84,838 | Rs. 62,240 |
Acer ALG, Intel Core i7-13th Gen 13620H, NVIDIA GeForce RTX 3050 | Rs. 99,990 | Rs. 66,990 |
ASUS TUF Gaming A15, AMD Ryzen 7 7435HS, NVIDIA RTX 3050 | Rs. 89,990 | Rs. 64,490 |
जाहिरात
जाहिरात