iMac 24-Inch चं नवं व्हर्जन आलं समोर पहा किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन सविस्तर

iMac 24-Inch मध्ये Apple Intelligence features आहेत

iMac 24-Inch चं नवं व्हर्जन  आलं समोर पहा किंमत, फीचर्स, स्पेसिफिकेशन सविस्तर

Photo Credit: Apple

iMac 24-inch (2024) runs on macOS Sequoia out-of-the-box

महत्वाचे मुद्दे
  • iMac 24-inch (2024) भारतामध्ये सुमारे Rs. 1,34,900 पासून सुरू होत आहे
  • भारतामध्ये iMac 24-inch (2024) ची विक्री 8 नोव्हेंबर पासून सुरू होणार
  • निळा, हिरवा, नारंगी, गुलाबी, जांभळा आणि चंदेरी, पिवळा रंग उपलब्ध आहे
जाहिरात

Apple कडून सोमवारी (28 ऑक्टोबर) 24 इंच iMac चं नवं व्हर्जन समोर आणलं आहे. यामध्ये कंपनीची नवी 3nm M4 chip आणि 4.5K Retina display देखील असणार आहे. यासोबत Magic Keyboard आहे ज्यात Touch ID, Magic Mouse,आणि Magic Trackpad accessories असणार आहेत ज्यामध्ये USB Type-C port असणार आहे. Apple Silicon chipset असलेल्या त्याच्या सर्व अलीकडील संगणकांप्रमाणे, नवीन 24-इंच iMac मध्ये Apple Intelligence features आहेत ज्याने यूएस मधील compatible devices रोलआउट करणे सुरू केले आहे.

iMac 24-inch (2024)ची भारतामधील किंमत काय?

iMac 24-inch (2024) भारतामध्ये सुमारे Rs. 1,34,900 पासून सुरू होत आहे. हे बेस मॉडेल आहे. ज्यात 8-core CPU, 8-core GPU, 16GB RAM आणि 256GB storage आहे. हा प्री ऑर्डर साठी उपलब्ध आहे. जो निळा, हिरवा, नारंगी, गुलाबी, जांभळा आणि चंदेरी, पिवळा रंगामध्ये उपलब्ध आहे. भारतामध्ये त्याची विक्री 8 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे.

ग्राहकांना हे संगणक 10-core CPU, 10-core GPU,आणि 16GB+256GB, 16GB+512GB व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे Rs. 1,54,900 आणि Rs. 1,74,900 आहे. सर्वोच्च मॉडेल मध्ये 24GB रॅम आणि 1TB स्टोरेज सह उपलब्ध आहे. हाच 10-core CPU आणि 10-core GPU ची किंमत Rs. 1,94,900 असणार आहे.

iMac 24-inch (2024) ची फीचर्स काय?

नव्याने लॉन्च iMac मध्ये 24-inch 4.5K (4,480x2,250 pixels) रेटिना डिस्प्ले आहे. ज्यात peak brightness 500 nits असणार आहे. Apple च्या माहितीनुसार, ग्राहकांना डीस्प्ले वर nano-texture matte glass फिनिश मिळणार आहे. यामध्ये फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. 1080p video recording ची त्यामध्ये सोय आहे.

Apple ने TSMC च्या 3nm process technology वर तयार केलेल्या नवीन M4 चिपसह ऑल-इन-वन कम्प्युटर आहे. हा 8-core CPU/ 8-core GPU आणि 10-core CPU, 10-core GPU सह असणार आहे. यामध्ये 32GB रॅम आणि 2TB स्टोरेज आहे. M4 chip सह 16-core Neural Engine आहे.

कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi 6E, Bluetooth 5.3, up to four Thunderbolt 4/ USB 4 ports आणि 3.5mm audio jack आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. iQOO 15 ची भारतातील किंमत लॉन्चपूर्वी लीक; 26 नोव्हेंबरला होणार पदार्पण
  2. Redmi K90 Ultra मध्ये मिळणार मेजर अपग्रेड्स; डिस्प्लेपासून बॅटरीपर्यंतचे पहा अपडेट्स
  3. लॉन्चच्या आधी Vivo X300 Series ची भारतातील किंमत समोर आली
  4. Wobble चा डेब्यू स्मार्टफोन भारतात लॉन्च; किंमत 22,000 रूपयांपासून पुढे
  5. AMOLED स्क्रीन आणि नवीन Dimensity 8350 सह Lava Agni 4 भारतात दाखल
  6. Qualcomm Snapdragon 8 Gen 5 लॉन्च डेट आउट; काय मिळणार नवे फीचर्स
  7. फसवणूक मेसेज रोखण्यासाठी TRAI ची नवी सक्ती; व्हेरिएबल प्री-टॅगिंग बंधनकारक
  8. iPhone यूजर्ससाठी खुशखबर! AppleCare+ मध्ये Theft व Loss Protection ची भर
  9. लाँचपूर्वी Amazon वर Realme 15 Lite 5Gचा खुलासा; Dimensity 8000 चिपसेटसह किंमत व स्पेसिफिकेशन्स पहा
  10. Reliance Jio देत आहे ₹35,100 चे Gemini AI 3 सब्सक्रिप्शन मोफत
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »