अॅपलचा दावा आहे की M5 मध्ये M4 च्या तुलनेत 3.5 पट जास्त एआय परफॉर्मन्स आणि 1.6 पट जास्त ग्राफिक्स आहेत.
Photo Credit: Apple
नवीन मॅकबुक प्रोमध्ये १४.२ इंचाचा लिक्विड रेटिना प्रो एक्सडीआर डिस्प्ले आहे
Apple कडून M5 Apple Silicon chip असलेला 14-inch MacBook Pro लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये नवा प्रोसेसर आणि अपग्रेडेड GPU चा समावेश आहे. M5 चिपमध्ये सुधारित CPU कार्यक्षमता, सुधारित ग्राफिक्स रेंडरिंग आणि स्थानिक पातळीवर LLM चालवण्यासारख्या मोठ्या वर्कलोडसाठी हाय मेमरी बँडविड्थ देखील उपलब्ध आहे. SSD गती देखील सुधारली आहे, ज्यामुळे फाइल ट्रान्सफर आणि अॅप लाँच करणं जलद आणि सुकर झाले आहे.सध्या नव्या MacBook Pro च्या प्री ऑर्डर्स भारतामध्ये सुरू झाल्या असून 22 ऑक्टोबर पासून त्याची विक्री होईल. भारतातील अॅपलच्या चार रिटेल शोरूम मध्येही मॅकबूक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. दरम्यान हा MacBook Pro काळा आणि चंदेरी रंगात उपलब्ध असेल.
MacBook Pro मध्ये 14.2-inch Liquid Retina XDR display असणार आहे. 3024x1964 नेटिव्ह रेझ्युलेशन, 1600 nits peak brightness (HDR), ProMotion adaptive refresh rate up to 120Hz असणार आहे. हा मॅकाबूक 16GB, 24GB, 32GB रॅम आणि 512GB, 1TB, 2TB, 4TB SSD स्टोरेज असणार आहे. macOS 26 Tahoe ऑपरेटिंग सिस्टिमचा त्यामध्ये समावेश असणार आहे. अॅपलचा दावा आहे की M5 मध्ये M4 च्या तुलनेत 3.5 पट जास्त एआय परफॉर्मन्स आणि 1.6 पट जास्त ग्राफिक्स आहेत. वायरलेस कनेक्टीव्हिटीसाठी Wi-Fi 6E (802.11ax), Bluetooth 5.3 चा समावेश असेल. दरम्यान या मॅकबूकला 72.4Wh बॅटरी असणार आहे, 70W (bundled), 96W (optional) चार्जिंग पर्याय आहेत. तर 12MP Centre Stage camera मिळणार असून हाय-फिडेलिटी सहा-स्पीकर साउंड सिस्टम, 3.5 मिमी हेडफोन जॅक चा समावेश असणार आहे. वजनाला हा मॅकबूक 1.55kg चा आहे. मॅकबूचा आकार 12.31 x 8.71 x 0.61 इंच आहे.
14-inch MacBook Pro M5 with nano ची भारतामधील 16GB RAM + 512GB SSD storage व्हेरिएंटची किंमत Rs 184,900 पासून सुरू होते आणि 32GB RAM + 4TB SSD storage या टॉप मॉडेलसाठी ग्राहकांना Rs 344,900 मोजावे लागणार आहेत. यामध्ये विविध व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. दरम्यान काही बॅंकांच्या कार्ड्स वर Rs 10,000 ची कॅशबॅक ऑफर आहे आणि 12 महिन्यांसाठी नो इंटरेस्ट इएमआयचा पर्याय आहे.
जाहिरात
जाहिरात