Primebook 2 Neo हा लॅपटॉप PrimeOS 3.0 या custom-built operating system वर बेतलेल्या Android 15 वर चालणार आहे
Photo Credit: Primebook
प्राइमबुक २ निओमध्ये ६ जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम आणि १२८ जीबी यूएफएस २.२ स्टोरेज असेल
इंडियन टेक ब्रॅन्ड Primebook कडून त्यांचा नवा Android-powered laptop लवकरच बाजारात येणार आहे. Primebook 2 Neo हा आगामी लॅपटॉप 31 जुलै 2025 दिवशी लॉन्च केला जाणार आहे. एका प्रेस रीलीजच्या माध्यमातून आठवड्याच्या सुरूवातीला या नव्या लॅपटॉपची घोषणा करण्यात आली आहे. Primebook 2 Neo बाबत विद्यार्थी, यंग प्रोफेशनल्स आणि बजेट मध्ये नवा लॅपटॉप घेणार्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. बजेट मध्ये हा लॅपटॉप विकत घेता येणार असल्याने बजेट मध्ये लॅपटॉप घेण्याचा विचार करणार्यांना Primebook 2 Neo एक उत्तम पर्याय आहे.Primebook 2 Neo ची किंमत 15,990 पासून सुरू होणार आहे. किफायतशीर दरामध्ये दमदार फीचर्स असलेला हा लॅपटॉप आहे. दरम्यान पहिल्या 100 ग्राहकांसाठी हा लॅपटॉप खास असणार आहे. त्यांना Primebook च्या अधिकृत वेबसाईट वर लॅपटॉप विकत घेताना 1000 रूपयांची सूट मिळणार आहे. त्यामुळे लॅपटॉप ची किंमत त्यांच्यासाठी 14990 असणार आहे.
Primebook 2 Neo मध्ये MediaTek Helio G99 असणार आहे. हा octa-core processor आहे त्यामुळे त्याचा परफॉर्ममन्स चांगला आहे. हा 6GB of LPDDR4X RAM, सोबत जोडलेला आहे. मल्टीटास्किंग करता येणार आहे. अॅप स्विचिंग अगदी सुरळीत होणार आहे. ऑनलाईन क्लास साठी हा उत्तम आहे. इमेल, डॉक्युमेंट एडिटिंग देखील करता येणार आहे.
Primebook 2 Neo हा लॅपटॉप PrimeOS 3.0 या custom-built operating system वर बेतलेल्या Android 15 वर चालणार आहे. यामधील ऑपरेटिंग सिस्टिम युजर्सना डेस्कटॉप सारखा अनुभव देणार आहे. यावेळी Android ची फ्लेक्सिबिलिटी देखील राहणार आहे. तुम्ही पहिल्यांदा लॅपटॉप वापरत असाल किंवा टॅब / स्मार्टफोन वरून आता लॅपटॉप हाताळत असाल तरी तुम्हांला Primebook 2 Neoचा अनुभव सुखद असणार आहे.
Primebook 2 Neo मधील स्टोरेज देखील मुबलक आहे. Primebook 2 Neo हा 128GB of fast UFS 2.2 storage, सह आहे. त्यामध्ये microSD card,च्या मदतीने 512GB पर्यंत तो वाढवता देखील येतो. पण कदाचित सर्वात मनोरंजक भर म्हणजे बिल्ट-इन ऑन-स्क्रीन एआय असिस्टंट. Primebook ने अजून सर्व तपशील उघड केलेले नसले तरी, असिस्टंट व्हॉइस कमांड, जलद सूचना आणि सोपे नेव्हिगेशनमध्ये मदत करेल अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे बजेट कॉम्प्युटिंगमध्ये स्मार्ट तंत्रज्ञानाचा स्पर्श मिळेल.
तुम्ही Amazon, Flipkart आणि ऑफिशिएअल Primebook वेबसाइटवरून Primebook 2 Neo विकत घेऊ शकता. चांगल्या फीचर्स सह क्लीन Android अनुभवासह आणि वॉलेट-फ्रेंडली किमतीत स्मार्ट फीचर्स सोबत Primebook 2 Neo एंट्री-लेव्हल लॅपटॉप स्पेसमध्ये एक महत्त्वाचा पर्याय असणार आहे.
जाहिरात
जाहिरात