JioBharat J1 4G घेऊन येत आहे मोफत Jio ॲप्लिकेशनचे सबस्क्रिप्शन

JioBharat J1 4G घेऊन येत आहे मोफत Jio ॲप्लिकेशनचे सबस्क्रिप्शन

Photo Credit: Amazon

महत्वाचे मुद्दे
  • JioBharat J1 4G हा फोन एका रीयर कॅमेऱ्याने सज्ज आहे.
  • ह्या हँडसेट मध्ये कॉल उचलण्यासाठी आणि नाकारण्यासाठी बटन देण्यात आले आहेत.
  • JioBharat J1 4G हा ThreadX RTOS ह्या ऑपरेटिंग सिस्टमचे समर्थन करतो.
जाहिरात
जिथे सर्वच मोबाईल कंपनी आपले नवीन मोबाईल फोन्स लॉन्च करत असतात, तिथे Jio सुद्धा या शर्यतीत मागे राहण्यासारखा नाही. त्यामुळेच का होईना Jio घेऊन आला आहे त्यांचा नवीन फोन म्हणजेच JioBharat J1 4G. हा स्मार्टफोन जरी नसला तरी, तुम्हाला Jio च्या सर्व एप्लिकेशन्सचा म्हणजेच JioTv, JioCinema, JioSavn, JioPay, JioChat ह्या सर्वांचा आनंद घेता येणार आहे. चला तर मग पाहूया, काय असणार आहे ह्या  JioBharat J1 4G फोनची किंमत, उपलब्धता आणि वैशिष्ट्ये. 

JioBharat J1 4G फोनची किंमत आणि उपलब्धता.

JioBharat J1 4G हा फोन तुम्हाला देखील विकत घ्यायचा असेल तर तो तुम्हाला अमेझॉन भारतच्या अधिकृत वेबसाइट वर खरेदी करता येईल. ज्याची किंमत फक्त 1,799 रुपये असून हा फोन गडद राखाडी रंगामध्ये उपलब्ध आहे. 

JioBharat J1 4G ह्या फोनला JioBharat ह्या प्लॅनचे समर्थन करतो. ज्यामध्ये 123 रुपयांच्या रिचार्ज मध्ये 28 दिवस तर 1234 रुपयांमध्ये 336 दिवस असे प्लॅन उपलब्ध आहेत. ह्यामध्ये रोज 512 Mb डेटा, अमर्यादित कॉल्स आणि 300 संदेश 28 दिवसांकरिता अशा ऑफर्स देण्यात येतात. यासोबतच Jio च्या सर्व ॲप्लिकेशनचे सबस्क्रिप्शन सुद्धा रिचार्ज सोबत मिळणार आहे.

JioBharat J1 4G फोनची वैशिष्ट्ये. 

JioBharat J1 4G ह्या फोनमध्ये 2.8 इंचाचा टच पॅनल नसलेला डिस्प्ले देण्यात आलेला आहे. ह्या फोनची बॅटरी ही 2500mAh ची असून हा साधा फोन असल्याने दोन दिवसांपर्यंत आरामात चालू शकते. हा फोन ThreadX RTOS ह्या ऑपरेटिंग सिस्टम वर तयार करण्यात आला आहे. ह्या फोनची आंतरिक मेमरी उपलब्ध नसली तरीही स्टोरेज साठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट उपलब्ध असून त्याची क्षमता 128 GB पर्यंत आहे. मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या बाजूलाच नॅनो सिम स्लॉट देण्यात आला आहे, ज्यामध्ये फक्त Jio चे सिमकार्ड वापरता येऊ शकते.

JioBharat J1 4G च्या मागील बाजूस एक कॅमेरा सुद्धा जोडण्यात आलेला असून त्याचा मुख्यत्वे वापर हा JioPay द्वारे स्कॅनर वर स्कॅन करून पेमेंट करण्यासाठी केला जाऊ शकतो. जिओच्या ह्या फोनचा आकार हा 135 × 56 × 16 मिमी इतका आहे, आणि वजन फक्त 122 ग्रॅम आहे. 

तुम्ही देखील JioBharat J1 4G हा फोन विकत घेतला आहे का? जर घेतला असेल तर एक वापरकर्ता म्हणून तुमचा अनुभव कसा आहे, हे आम्हाला सुद्धा नक्की कळवा.
Comments
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »