Photo Credit: Alcatel
अल्काटेल व्ही३ अल्ट्रामध्ये ६.८ इंचाचा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.
Alcatel कडून लवकरच Alcatel V3 Ultra smartphone भारतामध्ये लॉन्च केला जाणार आहे. अद्याप या स्मार्टफोनची अधिकृत लॉन्च डेट जाहीर करण्यात आली नसली तरीही या फोनचे लीक झालेले काही अपडेट्स पाहता त्याच्या किंमतीचे अंदाज आता समोर आले आहेत. TCL Communication,चा हा ब्रॅन्ड असून त्यांच्याकडून केवळ Alcatel V3 Ultra ची माहिती समोर आली आहे. दोन अन्य मॉडेल्स सह हा फोन येऊ शकतो. Alcatel V3 Ultra मध्ये वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीज साठी वेगवेगळा डिस्प्ले मोड असेल असे समोर आले आहे. Alcatel smartphones भारतामध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येणार आहेत.Alcatel कडून भारतात 3 स्मार्टफोन्स लॉन्चचा अंदाज,GizmoChina, च्या रिपोर्ट्सनुसार Alcatel कडून भारतामध्ये 3 V series smartphones येण्याचा अंदाज आहे. Alcatel V3 Pro,Alcatel V3 Classic models सोबत Alcatel V3 Ultra येऊ शकतो. Alcatel V3 Ultra हा लाईनअप मधील प्रिमियम फोन असू शकतो. भारतामध्ये हा स्मार्टफोन 30 हजारांच्या रेंज मध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे.
Alcatel V3 series मध्ये advanced eye-care feature असू शकते असा अंदाज आहे. Alcatel आणि कंपनीचा संस्थापक, टेक अॅडव्हायझर Madhav Sheth ने नुकतेच Alcatel V3 Ultra येणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये खास डिस्प्ले मोड आहे.
ज्यात रिडिंग, वॉचिंग आणि स्क्रोलिंग साठी वेगवेगळा डिस्प्ले मोड असणार आहे. आगामी फोन मध्ये stylus support आहे. हा फोन ट्रिपल रेअर कॅमेरा युनिट सह येण्याचा अंदाज आहे.
Alcatel smartphones हा विक्रीसाठी फ्लिपकार्ट आणि Flipkart Minutes वरून जाण्याचा अंदाज आहे. ई कॉमर्स साईट वरील लिस्टिंग पाहता Alcatel V3 Ultra मध्ये TCL's proprietary NXTPAPER display असणार आहे. कंपनीने Padget Electronics या Dixon Technologies च्या सबसिडी कंपनीसोबत हातमिळवणी करत फोनची निर्मिती केली आहे.
जाहिरात
जाहिरात