Amazon Great Freedom Festival Sale, जाणून घ्या स्मार्टफोन्सवरील ऑफर्स

6 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाला आहे, Amazon Great Freedom Festival Sale.

Amazon Great Freedom Festival Sale, जाणून घ्या स्मार्टफोन्सवरील ऑफर्स
महत्वाचे मुद्दे
  • Amazon Great Freedom Festival Sale मध्यरात्री 12 वाजताच सुरू झालेला आहे.
  • सेलमधील ऑफर्स व्यतिरिक्त तुम्हाला बँक ऑफर्सचा देखील लाभ घेता येईल.
  • ह्या सेलमध्ये असंख्य वस्तूंवर मिळत आहे भारी रकमेच्या सवलती.
जाहिरात
Prime Day Sale नंतर आता 6 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाला आहे Amazon Great Freedom Festival Sale. ज्यामध्ये तुम्हाला मोबाईल आणि ॲक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक्स, होम अप्लायन्सेस, दैनंदिन गरजेच्या वस्तू, फॅशन आणि सौंदर्य प्रसाधने सारख्या असंख्य वस्तूंवर भारी रकमेची सूट मिळणार आहे. 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून हा सेल सुरू होणार आहेच पण ज्या वापरकर्त्यांकडे आधीपासूनच प्राईम मेंबरशिप आहे, त्यांना ह्या सेलमधील सवलतींचा जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. चला तर मग बघुयात, Amazon Great Freedom Festival Sale 2024 मध्ये स्मार्टफोन्स वर काय ऑफर्स मिळणार आहेत. 

Amazon Great Freedom Festival Sale मधील स्मार्टफोन्सच्या ऑफर्स


तुम्हाला सुद्धा जर iPhone खरेदी करायचा असेल तर, Amazon Great Freedom Festival Sale मध्ये iPhone 13 फक्त 47,999 रुपयांच्या विशेष किंमतीमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. OnePlus ने सुद्धा आपल्या तीन स्मार्टफोन्सवर भारी सूट दिली आहे. OnePlus 12R 5G, ह्या स्मार्टफोनची किंमत 40,999 रुपये असून सेलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन फक्त 17,999 मध्ये खरेदी करू शकता. त्यासोबतच OnePlus Nord CE ह्या स्मार्टफोनवर सुद्धा 3,000 रुपयांची सूट मिळत आहे, जो तुम्ही 16,999 मध्ये खरेदी करू शकता. OnePlus Nord 4 5G हा स्मार्टफोन Amazon Great Freedom Festival Sale मध्ये बँकेच्या ऑफर्ससोबत 27,999 रुपयांच्या किंमतीवर खरेदी करता येईल. Moto Razr 50 Ultra 89,999 रुपये तर Moto Razr 40 सिरीज 34,999 रुपयांपासून खरेदीसाठी उपलब्ध आहे. 

 Samsung Galaxy S21 FE 5G ह्या स्मार्टफोनची मूळ किंमत 28,999 रुपये असून सेलमध्ये तुम्हाला 4,000 रुपयांची सूट देण्यात येणार आहे. Samsung Galaxy S24 सुध्दा 74,999 च्या किंमतीमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत. त्याशिवाय सॅमसंगच्या स्मार्टफोनवर तुम्हाला 15,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. Amazon Great Freedom Festival Sale मध्ये OPPO F27 Pro ची किंमत 25,999 रुपये तर, OPPO A3X 5G ची किंमत 12,999 रुपये आहे. iQoo Neo 9pro वर 2000 रुपयांची सूट तर Redmi 12 5G 11,499 रुपये, Redmi 13 5G 12,999 रुपये अशा किंमतीमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत.

Amazon Great Freedom Festival Sale मध्ये Vivo Y-Series ची किंमत 7,249 रुपयांपासून सुरू होते आणि Vivo X Fold3 Pro, 1,44,999 च्या किंमतीमध्ये मध्ये उपलब्ध आहे.

Amazon Great Freedom Festival Sale अतिरिक्त ऑफर्स


ह्या फेस्टिवल मध्ये SBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना 10% ची सूट ऑफर मधील कोणत्याही स्मार्टफोन खरेदी वर देण्यात येत आहे. याशिवाय जर तुमच्याकडे Amazon Pay ICICI क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला 5% कॅशबॅक सुद्धा मिळू शकतो. यासोबतच जर तुम्ही एक अमेझॉन प्राईम सदस्य आहात, तर तुमच्यासाठी अधिक सवलती आणि 24 तासांच्या आत डिलिव्हरी सुद्धा देण्यात येत आहेत.
 
Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  2. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  3. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  4. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
  5. Samsung चा Galaxy Unpacked 2025 होणार 9 जुलैला; Foldables येणार ग्राहकांसमोर
  6. Vivo Unveils X200 FE मध्ये काय आहेत खास फीचर्स? भारतात लॉन्च कधी? घ्या जाणून अपडेट्स
  7. Nothing Phone 3 मध्ये पहा कॅमेरा बद्दलचे अपडेट्स; 50MP Triple Camera System असणार
  8. Oppo Reno 14 5G स्मार्टफोन लवकरच Amazon, Flipkart द्वारा भारतातही येणार; झलक आली समोर
  9. OnePlus चा नवा नेकबँड भारतात लाँच; एका चार्ज मध्ये तब्बल 36 तास चालणार, विक्री 24 जूनपासून
  10. Samsung Galaxy M36 5G ची भारतातील लॉन्च डेट जाहीर; डिझाइन लीक आधीच समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »