Photo Credit: Samsung
Samsung Galaxy Unpacked यंदा 22 जानेवारी दिवशी होणार आहे. या इव्हेंट मध्ये Samsung Galaxy S25 series लॉन्च होणार आहे. जसा हा इव्हेंट जवळ येत आहे तसे आता Galaxy S25, Galaxy S25+ आणि Galaxy S25 Ultra बाबतचे अधिक तपशील समोर येत आहेत. नव्या माहितीमध्ये आता या Galaxy S series मधील स्मार्टफोन्सच्या किंमती देखील समोर आल्या आहेत. नव्या सीरीज मध्ये स्मार्टफोन हे अधिक महाग असणार आहेत.
Tarun Vats (@tarunvats33) ने X वर केलेल्या पोस्ट नुसार, Galaxy S25 model ची किंमत अंदाजे 84,999 असू शकते या फोन मध्ये 12GB of RAM and 256GB of inbuilt storage आहे. तर 12GB+512GB व्हेरिएंट्स साठी 94,999 रूपये मोजावे लागणार आहेत. मागील वर्षी Galaxy S24 आला होता त्याची किंमत 8GB+128GB model साठी 74,999 आहे.
Samsung Galaxy S25+ ची किंमत 1,04,999 आहे. ही किंमत 12GB+256GB model साठी आहे. Vats, नुसार, Galaxy S24+ ची 99,999 रूपये किंमत होती त्यापेक्षा ही किंमत अधिक असणार आहे. 2GB+512GB व्हेरिएंट ची किंमत Rs. 1,14,999 आहे.
Samsung Galaxy S25 Ultra हा या सीरीज मधील अव्वल स्मार्टफोन आहे. त्याची किंमत 1,34,999 रूपये असू शकते. ही किंमत 12GB+256GB साठी आहे. तर 16GB+512GB variant ची किंमत Rs. 1,44,999 असू शकते. 16GB+1TB model या टॉप व्हेरिएंट साठी Rs. 1,64,999 मोजावे लागातील.
लीक झालेल्या माहितीनुसार, सार्याच फोनच्या किंमतीमध्ये थोडी फार दरवाढ असणार आहे. नव्या Snapdragon 8 Elite chipset सह हे स्मार्टफोन असतील. Galaxy Unpacked या 22 जानेवारीच्या इव्हेंट साठी सध्या सॅमसंग सज्ज झाली आहे. Galaxy S series smartphones साठी रिझर्व्हेशन सुरू झाली आहे. भारतामध्ये कंपनीच्या वेबसाईट वर ते बुकिंग सुरू आहे. सध्या सॅमसंगच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर सोबतचा एक्झुलिव्ह स्टोअर मध्येही रिझव्हेशन करता येणार आहे.
जाहिरात
जाहिरात