Photo Credit: Reliance Jio
JioTag Go भारतामध्ये बुधवारी लॉन्च झाला आहे. हा भारतामधील पहिला Android tracker आहे ज्याला Google's Find My Device network शी जोडलेले आहे. आता युजर्स Google च्या Find My Device app सोबत ट्रॅकर लोकेट करू शकतात. जगभरातील अॅन्ड्रॉईड फोनच्या नेटवर्क सोबत ते जोडलेले आहे. Bluetooth-enabled tracker च्या बॅटरीचा विचार करता ती वर्षभर चालू शकते. 2024 च्या जुलै महिन्यात Reliance कडून JioTag Air लॉन्च करण्यात आले. हे Apple च्या Find My network सोबतही काम करते.
JioTag Go ची भारतामधील किंमत Rs. 1,499 आहे. भारतामध्ये JioTag Go हा Amazon, JioMart e-store आणि Reliance Digital व My Jio stores वर उपलब्ध आहे. हे ट्रॅकर काळा, ऑरेंज, पांढरा आणि पिवळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे.
JioTag Go हे ब्लूटुथ ट्रॅकर आहे जे गूगलच्या Find My Device feature सोबत जोडलेले आहे. ट्रॅकर अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर Find My Device अॅप्लिकेशन सोबत कनेक्ट होतो, जे युजर्स प्ले स्टोअरद्वारे अॅअॅकसेस करू शकतात. लोक याचा वापर जगभरातील त्यांच्या वस्तूंचा मागोवा घेण्यासाठी करू शकतात, असे कंपनीने म्हटले आहे.
हा ट्रॅकर चाव्या, पर्स, सामान, गॅझेट्स, बाईक आणि बरेच काही गोष्टींना जोडला जाऊ शकतो आणि नंतर वस्तू हरवल्यास शोधण्यासाठी वापरता येईल. ब्लूटूथ रेंजमध्ये असताना, युजर्स Find My Device ॲपवरील ‘Play Sound' पर्यायावर टॅप करू शकतात आणि संबंधित JioTag Go एक बीपिंग आवाज करेल, ज्यामुळे हरवलेली वस्तू सहजपणे शोधण्यात मदत होईल.
Reliance Jio कडील नवा ट्रॅकर Android 9 आणि त्यावरील स्मार्टफोन्स सोबत काम करेल. ते iPhones शी कनेक्ट होत नाही. विशेष म्हणजे, JioTag Air iOS 14 किंवा त्यानंतरच्या चालणाऱ्या iPhone मॉडेल्स, तसेच Android 9 आणि त्यानंतरच्या Android स्मार्टफोन्ससोबत काम करतील.
JioTag Go ला काम करण्यासाठी सिम कार्डची आवश्यकता नाही. हे ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी सोबत काम करते आणि CR2032 बॅटरी सोबत आहे. ही एक वर्षापर्यंत चालेल असे म्हटले जाते. Amazon लिस्टिंग वरून असे दिसून आले आहे की ट्रॅकरचा आकार 38.2 x 38.2 x 7.2mm आहे आणि त्याचे वजन 9g आहे.
जाहिरात
जाहिरात