HONOR X60i च्या प्रिबुकिंग वर मिळणार खास सवलत

HONOR X60i चा प्राथमिक कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा असून 2 मेगापिक्सलची लेन्स सुद्धा देण्यात आली आहे. त्यामुळे फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन म्हणजे अव्वलच.

HONOR X60i च्या प्रिबुकिंग वर मिळणार खास सवलत

Photo Credit: Gadgets 360

महत्वाचे मुद्दे
  • HONOR X60i मध्ये 6.7 इंचाचा FHD आणि AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित MagicOS 8.0 सह बनविण्यात आला आहे.
  • HONOR X60i ह्या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
जाहिरात
HONOR हया स्मार्टफोन कंपनीने एप्रिल 2024 मध्ये चीनमध्ये त्यांचा एक स्मार्टफोन लॉन्च केला तो म्हणजे HONOR X60i. आंतरराष्ट्रीय पातळीवर लॉन्च झालेला हा स्मार्टफोन भारतात केव्हा लॉन्च होणार अशी उत्सुकता HONOR च्या वापरकर्त्यांमध्ये दिसून येते. पण त्यांची ही उत्सुकता फार ताणून न घेता हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करून ऑगस्ट 2024 पासून तो भारतात खरेदीसाठी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. चला तर मग बघुया काय आहेत HONOR X60i ची वैशिष्ट्ये आणि किंमत. 

HONOR X60i ची किंमत आणि उपलब्धता. 


HONOR X60i हा स्मार्टफोन क्लाउड ब्लू, कोरल परपल, मॅजिक नाइट ब्लॅक आणि मून शॅडो व्हाइट अशा चार रंगांमध्ये उपलब्ध आहे ज्याच्या स्टोरेज वरून त्याचे वेगवेगळे तीन प्रकार खालीलप्रमाणे पडतात. 
  • 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज, ज्याची किंमत आहे 16,100 रुपये.
  • 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज, ज्याची किंमत आहे 18,400 रुपये.
  • 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज, ज्याची किंमत आहे 20,700 रुपये. 

हा स्मार्टफोन तुम्ही आधीच ऑर्डर करून बुक करून खरेदी करू शकता त्यासाठी तुम्हाला HONOR CHINA च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यायला हवी.

HONOR X60i ची वैशिष्ट्ये.


HONOR X60i ह्या स्मार्टफोनचा डिस्प्ले हा 90Hz रिफ्रेश रेटचा असून 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. 2412 × 1080 चे FHD रेजोल्युशन आणि 2000nits ची तेजस्विता ह्या डिस्प्लेला देण्यात आली आहे. ह्या स्मार्टफोनची रॅम ही 8GB आणि 12GB अशा दोन प्रकारांमध्ये मोडते. ह्याची स्टोरेज क्षमता ही 256GB आणि 512GB अशा दोन प्रकरांसोबत ह्या स्मार्टफोनचे तीन वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याची किंमत आणि प्रकार वर नमूद करण्यात आले आहेत.

हा स्मार्टफोन OctaCore MediaTek Dimensity 6080 ह्या प्रोसेसरचे समर्थन करतो. HONOR X60i च्या मागील बाजूस दोन कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामधील प्राथमिक कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा असून 2 मेगापिक्सलची लेन्स सुद्धा देण्यात आली आहे. त्यामुळे फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन म्हणजे अव्वलच. सोबतच सेल्फी काढण्यासाठी समोरील कॅमेरा हा 8 मेगापिक्सलचा ठेवण्यात आला आहे.

ह्या स्मार्टफोनची बॅटरी ही 5000 mAh असून 35 वॅटच्या चार्गींगचे समर्थन करते. तुम्हीसुद्धा HONOR X60i विकत घेण्याचा विचार करत आहात का? तर मग त्वरा करा.
 
Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. फोल्ड डिझाइनचा सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल; पहा फीचर्स
  2. Samsung Galaxy Z Fold 7 भारतात लॉन्च; इथे पहा किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स
  3. Galaxy Buds 3 Pro वर Amazon Prime Day सेलमध्ये मोठा डिस्काउंट जाहीर
  4. Amazon Prime Day 2025 मध्ये iQOO स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स जाहीर; पहा अपडेट्स
  5. 14 जुलै ला लॉन्च होणार्‍या Vivo X Fold 5 आणि X200 FE च्या किंमती इंटरनेट वर लीक
  6. आयफोनही आता येणार दमदार बॅटरीज सोबत; पहा iPhone 17 Pro Max बद्दलची अपडेट
  7. Honor X9c 5G भारतात 7 जुलै येतोय; 12 जुलै पासून विक्री होणार Amazon वर सुरू
  8. Amazon चा 72 तासांचा Prime Day सेल जाहीर; पहा स्मार्टफोन सह कोणत्या वस्तूंवर मिळणार सूट
  9. Nothing Headphone (1) भारतात लॉन्च; पहा प्रीमियम फीचर्स, किंमत इथे
  10. Nothing Phone (3) भारतात अखेर आलाच; किंमत ₹79,999 पासून सुरू
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »