Photo Credit: Infinix
Infinix Zero 40 5G comes in Moving Titanium, Rock Black and Violet Garden shades
Infinix या स्मार्टफोन कंपनीने त्यांचे नवीन स्मार्टफोन म्हणजेच Infinix 40 सिरिजचे दोन्ही स्मार्टफोन Infinix Zero 40 4G आणि Infinix Zero 40 5G गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी मलेशियामध्ये लॉन्च केले आहेत. या स्मार्टफोनचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही स्मार्टफोन GoPro मोडचे समर्थन करतात. जर तुम्हाला देखील व्हिडिओ किंवा कंटेंट बनविण्यात रुची असेल तर हा स्मार्टफोन तुमच्यासाठीच लॉन्च करण्यात आला आहे असे म्हणायला हरकत नाही. कारण या सिरिजच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा बसविण्यात आला आहे, शिवाय GoPro ला कनेक्टिव्हिटी सुध्दा प्रदान करतो. चला तर मग बघुया नुकत्याच लॉन्च झालेल्या Infinix Zero 40 4G आणि Infinix Zero 40 5G या स्मार्टफोनची वैशिष्ट्ये, किंमत आणि बरेच काही.
Infinix Zero 40 सीरीजच्या दोन्ही स्मार्टफोनचा डिस्प्ले हा 6.7 इंचाचा असून यामध्ये फुल HD+ रिझोल्यूषन सोबत 144 Hz रिफ्रेश रेट सुध्दा देण्यात आला आहे. त्यासोबतच या डिस्प्लेची तेजस्विता 1300 nits पर्यंत वाढविण्यात येऊ शकते. सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये Gorilla glass प्रोटेक्शन आणि फींगर प्रिंट स्कॅनर सुद्धा जोडण्यात आला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन XOS 14.5 वर आधारित असलेल्या Android 14 वर चालतात. ज्यामध्ये जवळजवळ तीन वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Infinix Zero 40 सीरीजच्या दोन्ही स्मार्टफोन मध्ये 50 मेगापिक्सलचा Samsung JN1 फ्रंट फेसिंग कॅमेरा बसविण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोनच्या मागील कॅमेरा प्रणालीमध्ये OIS च्या समर्थनासोबत 108 मेगापिक्सलचा Samsung HM6 हा प्राथमिक कॅमेरा, 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देखील बसविण्यात आला आहे. Infinix Zero 40 4G मध्ये 2K 30fps पर्यंत व्हिडिओ शूट करता येते, तर Infinix Zero 40 5G या स्मार्टफोनमध्ये 4K 60fps पर्यंत व्हिडिओ कॅप्चर करता येते.
Infinix Zero 40 4G हा स्मार्टफोन MediaTek Helio G100 चिपद्वारे समर्थित असून याची रॅम 8 GB इतकी आहे. तसेच Infinix Zero 40 5G स्मार्टफोन Dimencity 8200 SoC या चीपसेटद्वारे समर्थित असूंन याची रॅम 12 GB इतकी आहे. हे दोन्ही स्मार्ट मध्ये 256 GB आणि 512 GB अंतर्गत स्टोरेज प्रदान करतात. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी असून 45 वॅटच्या चार्जिंगचे समर्थन करते. तर 5G स्मार्टफोन 20 वॅटच्या वायरलेस चार्जिंग आणि 10 वॅटच्या रिव्हर्स वायरलेस चार्जिंगचे देखील समर्थन करते.
Infinix Zero 40 4G आणि Infinix Zero 40 5G हे दोन्ही स्मार्टफोन मलेशियामध्ये लॉन्च झाले असून आठ सप्टेंबर पासून मलेशियन बाजारपेठेत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. कंपनीकडून सध्यातरी या स्मार्टफोनच्या मलेशियन किंमती समोर ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये Infinix Zero 40 4G या स्मार्टफोनची किंमत MYR 1,200 इतकी असून भारतीय 23,300 रुपये इतकी आहे. त्यासोबतच Infinix Zero 40 5G या स्मार्टफोनची किंमत MYR 1,699 इतकी म्हणजेच भारतीय 33,000 रुपये इतकी आहे. Infinix Zero 40 4G हा स्मार्टफोन मिस्टी एक्वा, ब्लॉसम ग्लो आणि रॉक ब्लॅक या रंगामध्ये तर Infinix Zero 40 5G हा स्मार्टफोन व्हायलेट गार्डन, मूव्हिंग टायटॅनियम आणि रॉक ब्लॅक यासारख्या तीन रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
जाहिरात
जाहिरात