Photo Credit: Infinix
Infinix Zero Flip लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार आहे. हा कंपनी कडून लॉन्च होणारा पहिला clamshell-style foldable phone आहे. मागील महिन्यामध्ये हा ग्लोबल मार्केट मध्ये लॉच झाला आहे. आता हा ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर लॉच होण्याची शक्यता आहे. Transsion च्या मालकीच्या कंपनीने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. Infinix Zero Flip मध्ये MediaTek Dimensity 8020 chipset सह हा फोन 6.9-inch inner screen सह हा फोन आहे. यामध्ये कव्हर डिस्प्ले 3.64-inch आहे. या फोन मध्ये 50 megapixel dual outer camera सेटअप आहे. यामध्ये तिसरा कॅमेरा देखिल 50-megapixel camera चा आहे. hole-punch cutoutफोनच्या इनर स्क्रीन मध्ये आहे.
कंपनीच्या वेबसाईट वरील माहितीनुसार, Infinix Zero Flip भारता मध्ये 17 ऑक्टोबर दिवशी लॉन्च होणार आहे. हा फोन Blossom Glow आणि Rock Black रंगामध्ये लॉन्च होणार आहे. फोनच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. तो लॉन्चच्या वेळेस किंमत आणि अन्य गोष्टींबाबत खुलासा होणार आहे.
Infinix Zero Flip मध्ये मागील महिन्यात लॉन्च झालेल्या मॉडेल प्रमाणेच फीचर्स असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या फोन मध्ये Dimensity 8020 chipset from MediaTek असू शकते. जे फोन मध्ये 16GB RAM आणि 512GB inbuilt storage सोबत लिंक असणार आहे. हा फोन XOS 14 वर चालणार आहे. जो Android 14 वर बेस्ड आहे.
Infinix Zero Flip मध्ये 6.9-inch full-HD+ AMOLED screen आहे. तर 120Hz refresh rate आहे. या फोनमध्ये 3.64-inch AMOLED cover display आहे. Zero Flip मध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी 50-megapixel primary camera आहे. ज्यामध्ये optical image stabilisation आहे. 50-megapixel ultrawide camera आहे. inner display मध्ये 50-megapixel camera आहे. inner आणि outer cameras वापरून 4K videos शूट करता येतात. हॅन्डसेट मध्ये GoPro integration आहे.
Infinix Zero Flip मध्ये dual stereo speakers आहेत. JBL सोबत ते ट्यून केलेले असतील. या फोन मध्ये 2 OS upgrades मिळतील. तर बॅटरी 4,720mAh आहे. फोन 70W चार्जिंग अॅडाप्टर सोबत चार्ज होणार आहे.