iPhone 16 आणि iPhone 16 Plus केव्हा होणार खरेदीसाठी उपलब्ध

सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी Apple ने त्यांच्या एका कार्यक्रमात iPhone 16 ही त्यांची मालिका लॉन्च केली आहे

iPhone 16 आणि iPhone 16 Plus केव्हा होणार खरेदीसाठी उपलब्ध

Photo Credit: Apple

iPhone 16 and iPhone 16 Plus are both equipped with a vertical camera layout

महत्वाचे मुद्दे
  • iPhone 16 आणि iPhone 16 Plus हे दोन्ही Apple A18 SoC ने समर्थित
  • हे दोन्ही स्मार्टफोन मॅक्रो फोटोग्राफीचे समर्थन करतात
  • Apple ने iPhone 16 च्या सिरिजला दीर्घकाळ बॅटरी आयुष्य देणार आहे
जाहिरात

सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी Apple ने त्यांच्या एका कार्यक्रमात iPhone 16 ही त्यांची मालिका लॉन्च केली आहे. या मालिकेतील दोन महत्वाचे स्मार्टफोन म्हणजेच iPhone 16 आणि iPhone 16 Plus सुध्दा या कार्यक्रमात लॉन्च झाले आहेत. या स्मार्टफोन मध्ये Apple चे स्वत:चे AI म्हणजेच Apple Intelligence त्यासोबतच ॲक्शन बटन आणि कॅमेरा कंट्रोल बटन सुध्दा देण्यात आले आहेत. त्यासोबतच जाणून घेऊयात काय आहेत iPhone 16 आणि iPhone 16 Plus ची किंमत, वैशिष्ट्ये आणि उपलब्धता.

iPhone 16 आणि iPhone 16 Plus ची किंमत आणि उपलब्धता

भारतामध्ये iPhone 16 च्या 128 GB स्टोरेज प्रकाराची किंमत 67,100 रुपयां पासून सुरू होत असून समान स्टोरेज प्रकारामध्ये iPhone 16 Plus ची किंमत 75,500 रुपये इतकी आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 512 GB या स्टोरेज प्रकारामध्ये आणि काळा, गुलाबी, निळा, अल्ट्रमारीन तसेच सफेद रंगामध्ये देखील खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 13 सप्टेंबर पासून प्री ऑर्डर देखील करू शकता. त्यासोबतच कंपनीकडून 20 सप्टेंबर 2024 पासून विक्री सुरू करण्यात येणार आहे.

iPhone 16 आणि iPhone 16 Plus ची वैशिष्ट्ये

iPhone 16 हा स्मार्टफोन iOS 18 वर चालतो. तसेच यामध्ये 3nm octa-core A18 सुध्दा बसविण्यात आली आहे, जी 6-core CPU, 5-core GPU आणि 16-core neural engine या वैशिष्ट्यांनी समर्थित आहे. हे स्मार्टफोन Apple Intelligence या ॲपलच्या AI प्रणालीचे सुध्दा समर्थन करतात. यामध्ये 6.1 इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले सुध्दा बसविण्यात आला आहे, ज्याची कमाल तेजस्विता 2000 nits पर्यंत वाढविण्यात येऊ शकते. या स्मार्टफोनला IP68 रेटिंग सुध्दा प्राप्त आहे.

iPhone 16 Plus या स्मार्टफोन मध्ये 6.7 इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले बसविण्यात आला आहे. या दोन्ही स्मार्टफोनचे सर्वात विशेष असे वैशिष्टय म्हणजे iPhone 15 pro मध्ये देण्यात आलेले ॲक्शन बटन कॅमेरा कंट्रोल बटन देखील देण्यात आले आहे.

iPhone 16 आणि iPhone 16 Plus या दोन्ही स्मार्टफोनचा कॅमेरा समान आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा 2x झूम कॅमेरा सेन्सर सोबतच 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि सेल्फी काढण्यासाठी 12 मेगापिक्सलचा कॅमेरा बसविण्यात आला आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. iQOO Neo 11 लवकरच होणार उपलब्ध; 35K मध्ये मिळणार फ्लॅगशिप फीचर्स?
  2. Flipkart वर दिसला Realme GT 8 Pro; भारतात लवकरच करता येणार खरेदी
  3. Vivo X300 आणि X300 Pro अधिकृतपणे आला ग्लोबल मार्केटमध्ये; भारतातील लॉन्च लवकरच
  4. iQOO 15 भारतात लवकरच लॉन्च होणार; Geekbench लिस्टिंगमधून समोर आले महत्त्वाची फीचर्स
  5. Realme GT 8 Pro भारतात 20 नोव्हेंबरला लॉन्च होणार; जाणून घ्या खास फीचर्स
  6. Amazon ने भारतात लॉन्च केला Fire TV Stick 4K Select, Vega OS सह येणार खास फीचर्स
  7. Nothing चा नवीन Phone 3a Lite आला बाजारात, पारदर्शक डिझाइन आणि Glyph लाइट खास आकर्षण
  8. Oppo Enco X3s आले बाजारात, 55dB ANC आणि लाँग बॅटरीसह पहा खास फीचर्स काय?
  9. OnePlus 15 भारतात पदार्पणासाठी सज्ज; अत्याधुनिक Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट असणार
  10. Moto G67 Power च्या भारतातील लॉन्च डेटची घोषणा; 7,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा हायलाइट
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »