Photo Credit: iQOO
iQOO 13 लवकरच भारतामध्ये लॉन्च होणार आहे. सोमवार 28 ऑक्टोबर दिवशी चायनीज कंपनीकडून पुन्हा ही माहिती दिली आहे. अद्याप लॉन्च साठी ठोस तारीख सांगण्यात आलेली नाही. भारतामध्ये iQOO 13 खरेदीसाठी अमेझॉन वर उपलब्ध असणार आहे. सध्या iQOO 13 चीन मध्ये 30 ऑक्टोबरला लॉन्च होत आहे. यामध्ये Snapdragon 8 Elite chipset असणार आहे. तर BOE's Q10 8T LTPO OLED display असेल ज्यात 2K resolution असणार आहे.
X वरील पोस्ट नुसार, iQOO India ने हा फोन भारतात उपलब्ध असेल आणि यामध्ये Halo Light feature असेल याची माहिती दिली आहे. भारतामध्ये अमेझॉन सोबतच कंपनीचा अधिकृत वेबसाईट वर देखील तो उपलब्ध असणार आहे. कंपनीकडून X वर टीझर लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये Halo light element कॅमेर्याजवळ असणार आहे. त्यामुळे डायनॅमिक लाईटनिंग इफेक्ट आहे.
अमेझॉन कडून iQOO 13 साठी खास लॅन्डिंग पेज बनवण्यात आले आहे. हा फोन Snapdragon 8 Elite chipset वर चालणार आहे.
iQOO 13 आता 30 ऑक्टोबरला लॉन्च होण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीकडून फोन ची प्रमुख फीचर्स जाहीर केली आहेत. हा फोन चीन मध्ये स्थानिक वेळ संध्याकाळी 4 वाजता आणि 1:30pm IST ला लॉन्च होणार आहे. हा फोन काळा, हिरवा, ग्रे आणि पांढर्या रंगामध्ये उपलब्ध आहे. या नव्या हॅन्डसेट मध्ये BOE's Q10 8T LTPO OLED डिस्प्ले आहे. 2K resolution आणि 144Hz refresh rate आहे. दरम्यान या फोनची जाडी 7.99mm आहे. तर फोनमध्ये 6,150mAh बॅटरी आहे. हा फोन 20W fast charging support सह येणार आहे.
iQOO 13 मध्ये गेमिंग साठी सेल्फ डेव्हलप्ड गेमिंग चीप Q2 आहे. चीन मध्ये हा फोन OriginOS 5 सह येईल.
फोनमध्ये ड्युअल स्पीकर असतील आणि त्यात मल्टी-लेयर ग्राफीन आणि 7K अल्ट्रा-लार्ज व्हीसी हीट स्प्रेडरसह कूलिंग सिस्टम आहे. कॅमेरा स्पेसिफिकेशन्स अधिकृतपणे घोषित केले गेले नसले तरी, लीक झालेल्या माहितीनुसार, iQOO 13 ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 50-मेगापिक्सेल 2x टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील आहे.
जाहिरात
जाहिरात