Photo Credit: iQOO
iQOO 13 हा यंदा लॉन्च होणार्या बहुप्रतिक्षित स्मार्टफोन्सपैकी एक आहे. अद्याप सबब्रॅन्ड Vivo कडून त्याच्या अधिकृत लॉन्चची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र ऑनलाईन वर या स्मार्टफोन बद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. यामध्ये स्मार्टफोन्सच्या किंमती, स्पेसिफिकेशन आणि भारतामध्ये फोन लॉन्चच्या तारखेबद्दल माहिती समोर येत आहे. मागील वर्षीप्रमाणे iQOO 12 प्रमाणे यंदा iQOO 13 हा स्मार्टफोन
Snapdragon chipset वर चालणार आहे. तर स्मार्टफोन मध्ये 6.7-inch 2K AMOLED display आहे. तर 144Hz refresh rate असण्याचा अंदाज आहे. iQOO 13 मध्ये 6,150mAh बॅटरी असण्याचा अंदाज आहे.
SmartPrix च्या माहितीनुसार, Yogesh Brar (@heyitsyogesh),ने iQOO 13 बद्दल किंमत आणि स्पेसिफिकेशन अंदाज सांगितले आहेत. रिपोर्ट्सनुसार, iQoo 13 स्मार्टफोन भारतामध्ये डिसेंबर महिन्याच्या अखेरीस लॉन्च होऊ शकतो. अंदाजे 1 ते 10 डिसेंबर दरम्यान हा लॉन्च असू शकतो. भारतामध्ये या स्मार्टफोनची किंमत 55000 च्या आसपास असणार आहे.
iQOO 12 ची पहिली झलक चीन मध्ये मागील नोव्हेंबर मध्ये दाखवली होती. iQOO 12 Pro मागील वर्षी भारतात डिसेंबर 2023 मध्ये लॉन्च झाला होता. मागील व्हेरिएंट iQOO 12 पेक्षा या फोनची किंमत थोडी जास्त असणार आहे. 12GB + 256GB मॉडेलसाठी 52,999 रूपयामध्ये हा फोन लॉन्च झाला होता. आता अपग्रेड होणार्या फोन मध्ये हार्डवेअर अपग्रेड्स होत असल्याने किंमतीमध्येही वाढ होणार आहे.
iQOO 13 मध्ये रिपोर्ट्सच्या अंदाजानुसार, 6.7-inch AMOLED display सोबत 2K resolution आणि 144Hz refresh rate सह असणार आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 4 SoC वर चालणारा आहे. तर फोन मध्ये 16 जीबी रॅम आणि 512 जीबी पर्यंत स्टोरेज वाढवण्याची क्षमता आहे. स्मार्टफोन मध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा सेटअप असू शकणार आहे. प्रायमरी कॅमेरा 50 मेगा पिक्सेलचा असू शकेल तर अल्ट्रावाईड सेंसर 50 मेगा पिक्सेल आणि 50 मेगा पिक्सेल 2x telephoto camera असणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅट्स साठी 32 मेगा पिक्सेल फ्रंट कॅमेरा असणार आहे.
रिपोर्ट्सनुसार, iQOO 13 मध्ये अल्ट्रासोनिक इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असणार आहे. तर फोनला मेटल मिडल फ्रेम चा असणार आहे. त्यामध्ये फोनची बॅटरी 6,150mAh असणार आहे. फोनचा चार्जर 100W फास्ट चार्जर असणार आहे. IP68-rated हा स्मार्टफोन पाणी आणि धूळ रेसिस्टंट असणार आहे. या फोन मध्ये “Halo” light design असणार आहे.
iQOO कडून अद्याप या स्मार्टफोन बद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
जाहिरात
जाहिरात