iQoo Z9s 5G सिरीजच्या स्मार्टफोनमध्ये मिळणार Sony चा कॅमेरा

iQoo Z9s 5G आणि iQoo Z9s Pro 5G ह्या दोन्ही स्मार्टफोनची किंमत ही 25,000 रूपयांपेक्षा कमी असेल. अशी किंमत ठेवण्यामागे कंपनीचा मुख्य उद्देश्य हा स्मार्टफोन विशेष लक्षित वर्गासाठी उपलब्ध करून देण्याकडे जास्त आहे.

iQoo Z9s 5G सिरीजच्या स्मार्टफोनमध्ये मिळणार Sony चा कॅमेरा
महत्वाचे मुद्दे
  • iQoo Z9s 5G सिरिजचे स्मार्टफोन Vivo च्या ग्रेटर नोएडा फॅसिलिटी मध्ये तयार
  • ते फ्लॅम्बॉयंट ऑरेंज आणि लक्स मार्बलच्या फिनिशिंग सोबत बनविण्यात आले आहेत
  • iQoo Z9s 5G आणि iQoo Z9s Pro 5G हे स्मार्टफोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध
जाहिरात
भारतात iQoo Z9s 5G आणि iQoo Z9s Pro 5G हे स्मार्टफोन लॉन्च करणार अशी बातमी कळताच वापरकर्त्यांमध्ये एक वेगळीच उत्सुकता लागून राहिली होती. पण ही उत्सुकता न ताणता अखेरीस कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन भारतात 21 ऑगस्ट 2024 रोजी हे भारतात लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 ऑगस्ट रोजी झालेल्या एका मीडिया कॉन्फरन्स मध्ये Vivo ने आपल्याच iQoo ह्या ब्रँडच्या नवीन स्मार्टफोनची वैशिष्ट्ये काय असतील ह्याची स्पष्टता दिली आहे. कंपनीच्या मते हे दोन्ही स्मार्टफोन मल्टीटास्किंग किंवा शिक्षणासोबतच जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बनविण्यात आले आहेत. चला तर मग बघुयात, काय आहेत iQoo Z9s 5G सिरीजची वैशिष्टये किंमत आणि उपलब्धता. 

iQoo Z9s 5G सिरिजची वैशिष्ट्ये 

iQoo Z9s Pro 5G हा स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 3 ह्या प्रोसेसर सोबत सुसज्ज असेल, त्यासोबतच iQoo Z9s 5G सिरीजमध्ये Dimensity 7300 ही चीप बसविण्यात आली आहे. ह्या दोन्ही स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये OIS सोबत Sony IMX882 हा 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला 4k विडियो रेकॉर्डिंग सोबत सुपर नाइट मोड देखील मिळणार आहे. त्यासोबतच AI प्रणालीचा वापर हा फोटो एडिट करण्यासाठी होणार आहे, ज्यामुळे कोणत्याही फोटो एडिटर शिवाय तुम्ही अव्वल दर्जाचे फोटो काढू शकता. ह्या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीचे महत्व लक्षात घेता फोटोग्राफी प्रेमींसाठी हे स्मार्टफोन्स एक वरदानच आहेत.

iQoo Z9s Pro 5G मध्ये 8 मेगापिक्सल चा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आल आहे. ह्या स्मार्टफोनचा डिस्प्ले हा 120Hz च्या रिफ्रेश रेट सोबत 1800nits ची तेजस्विता प्रदान करतो. सुरुवातीला ह्या स्मार्टफोनची बॅटरी ही 4500mAh ची असेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता, पण आता 5500mAh बॅटरी देण्यात येत आहे. जलद कनेक्टिव्हिटी आणि अखंड मनोरंजन ह्या तरुणाईच्या गरजा लक्षात ठेऊनच हे दोन्ही स्मार्टफोन बनविण्यात आले आहेत. 

iQoo Z9s 5G सिरिजची किंमत आणि उपलब्धता

iQoo Z9s 5G सिरिजच्या दोन्ही स्मार्टफोनची किंमत नक्की काय असेल ह्यावर कोणतेही स्पष्टीकरण कंपनीने दिलेले नसून एक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार ह्या दोन्ही स्मार्टफोनची किंमत ही 25,000 रूपयांपेक्षा कमी असेल. अशी किंमत ठेवण्यामागे कंपनीचा मुख्य उद्देश्य हा स्मार्टफोन विशेष लक्षित वर्गासाठी उपलब्ध करून देण्याकडे जास्त आहे. Vivo च्या ग्रेटर नोएडा मध्ये स्तिथ असलेल्या कंपनीमध्ये हे स्मार्टफोन्स तयार करण्यात येत आहेत. भारतात 21 ऑगस्टला हे स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर Amazon आणि ViVo च्या अधिकृत वेबसाईट सोबत स्टोअर्स मध्ये सुद्धा हे स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध असतील.
Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. GSMA लिस्टिंगनुसार Samsung Galaxy Z Fold 8 बरोबरच Wider मॉडेलचीही एन्ट्री
  2. Apple ने iPhone SE आणि iPad Pro 12.9″ (2nd Gen) ला Vintage आणि Obsolete केले घोषित
  3. OnePlus 15R आणि Pad Go 2 Bengaluru इव्हेंटमध्ये अधिकृत होणार; महत्त्वाच्या फीचर्सची पुष्टी
  4. : लॉन्चपूर्वी OnePlus Pad Go 2 Geekbench वर! मिळाले Dimensity 7300 SoC आणि Android 16 फीचर्सचे संकेत
  5. Samsung Galaxy Z TriFold लॉन्च: 10-इंच इनर डिस्प्ले आणि 5,600mAh बॅटरीसह दमदार फोल्डेबल
  6. 200MP कॅमेरासह Redmi Note 16 Pro+ येणार? स्पेसिफिकेशन्स झाले लीक
  7. Realme Watch 5 चे डिझाइन, फीचर्स आणि कलर ऑप्शन्स इंडिया लॉन्चपूर्वी जाहीर
  8. FCC मंजुरीसह OnePlus Pad Go 2 US लॉन्चसाठी तयार; Android 16 आणि 5G सपोर्ट उघड
  9. Realme P4x 5G ची किंमत व तपशील लीक; 4 डिसेंबरला होणार लॉन्च
  10. Lava Play Max चे टीझर आउट, पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स बाबतचे अपडेट्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »