iQoo z9s सिरीज चे किती स्मार्टफोन्स होणार लॉन्च आणि काय असेल किंमत.

iQoo z9s सिरीज चे किती स्मार्टफोन्स होणार लॉन्च आणि काय असेल किंमत.
महत्वाचे मुद्दे
  • iQoo z9s मध्ये देण्यात येत आहे ट्रीपल कॅमेरा सेटअप.
  • ऑगस्ट 2024 मध्ये iQoo z9s भारतामध्ये लॉन्च होत आहे
  • iQoo z9s 80 वॅटच्या जलद चार्जींगचे समर्थन करू शकेल.
जाहिरात
iQoo ह्या मोबाईल कंपनीने नुकतीच त्यांची नवीन मोबाईल सिरीज iQoo z9 ही सिरीज लॉन्च करण्याचे आश्वासन दिले आहे. ह्या सिरीजमध्ये किती स्मार्टफोन मॉडेल्स लॉन्च करण्यात येतील, किंवा ते ऑगस्ट महिन्यातील कोणत्या तारखेला भारतात लॉन्च करण्यात येतील याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. पण ग्राहकांची उत्सुकता वाढविण्यासाठी कंपनीने एका स्मार्टफोनचा फर्स्ट लूक लॉन्च केला आहे, तो आहे iQoo z9s. चला तर मग बघुयात, काय विशेष असणार आहे iQoo च्या ह्या नवीन स्मार्टफोनमध्ये. 

iQoo z9s च्या डिझाईन्स.


iQoo z9s हा स्मार्टफोन अद्याप लॉन्च न झाल्याने त्याच्या डिझाइन ची सर्व कल्पना ही कंपनीने लॉन्च केलेल्या पोस्टर वरून येते. स्मार्टफोनच्या मागच्या भागावर असलेला कॅमेरा सेटअप हा चौकोनी आहे आणि त्याची वैशिष्टये ही iQoo 12 सारखीच असण्याची शक्यता आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअप सोबत कॅमेरा सेन्सरच्या खाली रिंग लाईट फ्लॅश देण्यात आला आहे. 

iQoo Z9s च्या मागच्या पॅनेलमध्ये पांढऱ्या रंगाच्या सावलीत चमकदार संगमरवरी फिनिश देण्यात आली आहे.  दरम्यान, iQoo चा लोगो हा स्मार्टफोनच्या मध्यभागी किंव्हा तळाशी असू शकतो. स्मार्टफोनच्या उजवीकडे व्हॉल्यूम आणि पॉवर की असेल आणि हा स्मार्टफोन पूर्णपणे चौकोनी नसून त्याच्या चारही कडा ह्या वक्र असतील.

iQoo z9s ची वैशिष्ट्ये.


iQoo z9s चा डिस्प्ले 6.78 असून सोबतच 144Hz रिफ्रेश रेट सुद्धा देण्यात येत आहे. ह्या स्मार्टफोनचा प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8s Gen 3 SoC आहे. आपण आता ह्या स्मार्टफोनची जर बॅटरी पहिली तर ती 6000 mAh ची असणार आहे आणि 80 वॅटच्या अती जलद चार्जिंचे समर्थन करणारी आहे. काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार iQoo z9s ह्या स्मार्टफोन सोबतच iQoo z9s pro सुद्धा लॉन्च होणार आहे. 

ह्या स्मार्टफोनमध्ये सगळ्यात महत्वाचा असणार आहे तो म्हणजे ह्याचा कॅमेरा. जो iQoo ने लॉन्च केलेल्या iQoo z9 turbo चा पुढचा मॉडेल असू शकतो, ज्यामुळे iQoo z9 turbo मध्ये दोन कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला होता तर iQoo z9s मध्ये ट्रीपल कॅमेरा देण्यात येणार आहे. 

iQoo z9 ह्या सिरीज चे नक्की कोणते मॉडेल्स भारतात ऑगस्ट मध्ये लॉन्च होणार आहेत, याबाबत बरीचशी माहिती ही कंपनीकडून देण्यात आलेली नाही. पण ह्या संबंधित अधिक माहितीसाठी आमच्या येणाऱ्या अपडेटसचा मागोवा नक्की ठेवा.
 
Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. 6,000mAh बॅटरी सह लॉन्च होणार Realme 14X
  2. Vivo V50 Series, Vivo Y29 4G दिसले EEC certification
  3. iQOO Neo 10 Pro मध्ये MediaTek Dimensity 9400 Chipset, AI features पहा काय आहे प्री रिझर्व्ह किंमत
  4. Oppo Reno 13 कोणत्या दमदार फीचर्स सह होणार लॉन्च पहा इथे
  5. Vivo Y300 5G ड्युअल रेअर कॅमेरा, 50-megapixel सह येणार पहा अन्य दमदार फीचर्स
  6. BSNL चा 84 दिवसांचा नवा रिचार्ज प्लॅन Airtel आणि Jio युजर्सना करतोय आकर्षित; पहा काय आहे दमदार प्लॅन
  7. आता कॉलिंग, एसएमएस ला सीम कार्डची गरज नाही, BSNL कडून direct-to-device satellite ची घोषणा
  8. OnePlus Ace 5 लवकरच होणार लॉन्च; भारतामध्ये OnePlus 13R म्हणून रिब्रॅन्ड होणार - रिपोर्ट्स
  9. BSNL युजर्सना आता देणार सेट-टॉप-बॉक्सशिवाय देणार Live TV पाहण्याची सुविधा; पहा काय आहे प्लॅन
  10. Vivo X200, X200 Pro, X200 Pro Mini मध्ये स्पेसिफिकेशन्स काय? घ्या जाणून
© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »