Photo Credit: Jio
Reliance Jio या कंपनीने 2023 मधील नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांचा JioPhone Prima 4G लॉन्च केला होता. आता या फोनचा उत्तराधिकारी म्हणून कंपनीने JioPhone Prima 2 हा फोन लॉन्च केला आहे. या छोट्याशा फोन मध्ये UPI पेमेंट पासून व्हिडिओ कॉल सारख्या सगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतात. चला तर मग बघुया, काय आहेत JioPhone Prima 2 ची वैशिष्ट्ये, किंमत आणि उपलब्धता.
JioPhone Prima 2 या छोट्या फोनमध्ये 2.4 इंचाची वक्र स्क्रीन असून किपॅड देण्यात आला आहे. तसेच हा फोन KaiOS 2.5.3 आणि Qualcomm चीपसेट वर चालतो. यामध्ये 4GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आणि मायक्रो एसडी सोबत 128 GB पर्यंत वाढविण्यात येऊ शकते.
JioPhone Prima 2 या फोनमध्ये मागच्या बाजूस आणि समोरील बाजूस असे दोन कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सोबतच LED टॉर्च सुध्दा मागच्या बाजूस देण्यात आली आहे. या फोनमधील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कुठलंही अधिक व्हिडिओ चॅट ॲप डाऊनलोड न करता देखील व्हिडिओ कॉल करता येऊ शकतो. यामधील नवीनतम वैशिष्टय म्हणजे हा फोन JioPay चे समर्थन करतो जे वापरकर्त्यांना कोणतेही QR code स्कॅन करून UPI पेमेंट करू देते.
JioPhone Prima 2 मध्ये मनोरंजनासाठी JioTV, JioCinema आणि JioSaavn सारखे आज देखील समाविष्ट आहेत. वापरकर्ते फेसबुक, यूट्यूब आणि गुगल असिस्टंट सारख्या कम्युनिकेशन आणि सोशल मीडिया टूल्सचा देखील वापर करू शकतात. हा फोन भारतातील 23 भाषांचे समर्थन करतो, ज्या यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामध्ये 2,000mAh बॅटरी असून हा फोन सिंगल नॅनो सिमद्वारे 4G कनेक्टिव्हिटीचे समर्थन करतो. यामध्ये 3.5 मिमी ऑडिओ जॅक देखील मिळतो आणि फोनला लेदरसारखे फिनिश देखील देण्यात आले आहे. त्यासोबतच या फोनचा आकार 123.4 x 55.5 x 15.1 मिमी इतका असून वजन 120 ग्रॅम इतके आहे.
JioPhone Prima 2 हा फोन भारतामध्ये 2,799 रुपयांपासून खरेदीसाठी सध्या फक्त निळ्या रंगाच्या एकाच शेडमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला देखील हा फोन खरेदी करायचा असेल तर तुम्ही Amazon च्या अधिकृत वेबसाईट वरून खरेदी करू शकता.
जाहिरात
जाहिरात