Lava Agni 3 ची स्क्रीन, बॅटरी ते कॅमेरा यांची पहा फीचर्स काय?

Lava Agni 3 ची स्क्रीन, बॅटरी ते कॅमेरा यांची पहा फीचर्स काय?

Photo Credit: Lava

Lava Agni 3 has a 1.74-inch AMOLED rear touch screen display

महत्वाचे मुद्दे
  • 'Action' button सह Lava Agni 3 लॉन्च झाला आहे
  • Heather Glass आणि Pristine Glass रंगामध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध
  • Lava Agni 3 चं बेस मॉडल 20,999 रूपयांपासून उपलब्ध आहे
जाहिरात

Lava Agni 3 भारतीय बाजारपेठांमध्ये लॉन्च झाला आहे. या मिडरेंज स्मार्टफोन मध्ये 6.78-inch AMOLED screen आहे तर 120Hz refresh rate आहे. तसेच 1.74-inch AMOLED touchscreen display असणार आहे. लावा अग्नी 3 मध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा सेट अप आहे. त्यामध्ये 16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300X chipset आहे. तर Android 14 वर चालणार्‍या या स्मार्टफोन मध्ये 8 जीबी रॅम आहे. तर बॅटरी 5,000mAh आहे.

Lava Agni 3 ची भारतामध्ये किंमत काय?

Lava Agni 3 भारतामध्ये बेस मॉडेल 8 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज फोनची किंमत 20,999 आहे. हा फोन चार्जर अ‍ॅडाप्टर शिवाय मिळणार आहे. काही फोन चार्जर सह मिळणार आहे त्याची किंमत 22,999 रूपये असणार आहे. Lava चा हा फोन 256GB storage सह Rs. 24,999 ला मिळणार आहे. त्यासोबत चार्जर असणार आहे.

भारतामध्ये अमेझॉन वर हा स्मार्टफोन 9 ऑक्टोबर पासून मध्यरात्री 12 पासून विक्रीसाठी खुला होणार आहे.यामध्ये Heather Glass आणि Pristine Glass रंगामध्ये हा स्मार्टफोन मिळणार आहे.

Lava Agni 3 ची स्पेसिफिकेशन

Lava Agni 3 मध्ये ड्युअल सीम आहे. दोन्ही नॅनो सीम आहेत. हा स्मार्टफोन Android 14 वर चालणार आहे. या हॅन्डसेट मध्ये 6.78-inch 1.5K (1,200x2,652 pixels) AMOLED screen अ‍सणार आहे. तर ब्राईटनेस 1200nits असणार आहे. रेअर पॅनल वर 1.74-inch AMOLED touch screen असणार आहे.

Lava च्या फोन मध्ये 4nm MediaTek Dimensity 7300X chipset असणार आहे. तर 8GB पर्यंत न वापरलेले स्टोरेज 'virtual RAM'म्हणून वापरले जाणार आहे. या फोन मध्ये 'Action' button आहे. त्याचा वापर करून फोन रिंगर आणि सायलंट मोड मध्ये बदलता येणार आहे. तसेच फ्लॅशलाईट फीचर साठी आणि कॅमेरा मध्ये शटर बटण म्हणूनही वापरता येते.

Lava च्या फोन मध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये 50 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आहे. त्यामध्ये optical image stabilisation आहे. 8 मेगापिक्सेल ultrawide camera आहे. 8 मेगापिक्सेल telephoto camera आहे तर 3x optical zoom आहे. फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आणि तो EIS सह आहे.

Lava Agni 3 मध्ये dual stereo speakers आहेत. Dolby Atmos Connectivity options आहेत. ज्यात 5G, 4G LTE, Wi-Fi-6E, Bluetooth 5.4, GPS, NavIC,आणि USB Type-C port आहे.

Comments
पुढील वाचा: Lava Agni 3, Lava Agni 3 Price in India, Lava
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »