Lava Agni 4 फोनमध्ये दोन Wet Touch Control mode आहेत. त्यामुळे ओल्या किंवा तेलकट हातानेदेखील फोन वापरता येऊ शकतो.
Photo Credit: Lava
Lava Agni 4 ची किंमत ₹22,999; 8GB RAM, 256GB स्टोरेज उपलब्ध
Lava कडून भारतामध्ये Agni 4 हा फोन भारतामध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन मिड रेंज स्मार्टफोन पोर्टफोलिओ मधील नवा फोन आहे जो मागील वर्षीच्या Agni 3च्या पुढील फोन असेल. हा नवा हॅन्डसेट त्याच्या डिझाईन मध्ये अपग्रेडसह येणार आहे. फोनच्या परफॉर्ममन्स आणि एआय फीचर मध्येही उत्तम असणार आहे. ब्रॅन्डचा फोकस क्लिन सॉफ्टवेअर आणि ड्युरेबल बिल्ड क्वॅलिटी वर असणार आहे.Lava Agni 4 ची भारतामधील किंमत,Lava Agni 4 ची भारतामधील किंमत 22,999 रूपये आहे. ही किंमत 8GB of RAM आणि 256GB of internal storage साठी असणार आहे. Lava ने ही किंमत प्रोमोशनल डेबिट आणि क्रेडिट कार्ड ऑफर सह दिली आहे. हा फोन अमेझॉन वर 25 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीला खुला असणार आहे. दरम्यान हा फोन Phantom Black आणि Lunar Mist या दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल.
Lava च्या Agni 4 मध्ये 6.67-inch flat AMOLED panel असून 120Hz refresh rate, 2,400 nits of local peak brightness आणि pixel density of 446ppi चा समावेश असणार आहे. हा हॅन्डसेट aluminium alloy frame सह येणार आहे. त्यामध्ये स्लिम 1.7mm bezels आणि matte AG glass rear panel चा समावेश असणार आहे.
फोनला Super Anti-Drop Diamond Frame असून Corning Gorilla Glass protection आणि IP64 rating आहे ज्यामुळे फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. फोनमध्ये दोन Wet Touch Control mode आहेत. त्यामुळे ओल्या किंवा तेलकट हातानेदेखील फोन वापरता येऊ शकतो. फोनमध्ये MediaTek's Dimensity 8350 chipset चा समावेश आहे जी LPDDR5X RAM आणि UFS 4.0 storage सोबत जोडलेली आहे. Lava ने AnTuTu v10 मध्ये 1.4 million points मिळवले आहेत. या हँडसेटमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशनसह 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. फ्रंटला 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी आहे. Lava Agni 4 मध्ये 5,000 mAh बॅटरी आहे जी 66W जलद चार्जिंगसह येते. Lava च्या माहितीनुसार, हँडसेट फक्त 19 मिनिटांत 50% पर्यंत चार्ज होऊ शकतो.
जाहिरात
जाहिरात
Xbox Partner Preview Announcements: Raji: Kaliyuga, 007 First Light, Tides of Annihilation and More
WhatsApp's About Feature Upgraded With Improved Visibility, New Design Inspired by Instagram Notes