Lava Blaze AMOLED 2 5G ची विक्री 16 ऑगस्ट पासून अमेझॉन च्या ई कॉमर्स वेबसाईट सह अन्य माध्यमातून ग्राहकांना विक्रीसाठी खुला होणार आहे.
Photo Credit: Lava
लावा ब्लेझ एमोलेड २ ५जी स्टीरिओ स्पीकर्सने सुसज्ज आहे
Lava कडून त्यांच्या भारतामधील 5G mobile phone series मध्ये अजून एक नवा स्मार्टफोन आणला आहे. Lava Blaze AMOLED 2 5G हा नवा स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन Feather White आणि Midnight Black,या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7060 processor चा समावेश आहे. तर फोनचा डिस्प्ले 6.67-inch AMOLED display आहे. 50MP रेअर कॅमेरा आहे. तर फोनमध्ये 5,000mAh battery आहे आणि 33W fast charging support फोनमध्ये असणार आहे. मग पहा या दमदार स्मार्टफोनमध्ये असलेली अन्य खास फीचर्स, स्पेसिफिकेशन्स कोणती?
Lava Blaze AMOLED 2 5G ची किंमत 6GB RAM आणि 128GB storage साठी Rs. 13,499 आहे. या फोनची विक्री 16 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. दरम्यान हा स्मार्टफोन अमेझॉन च्या माध्यमातून विकत घेता येणार आहे. सोबतच लावा कडून घरपोच आफ्टर सेल्स सर्व्हिस देखील जाहीर केली आहे. फोन विकत घेतल्यानंतर ग्राहकांना थेट सपोर्ट देखील मिळणार असल्याची माहिती लावा कंपनी कडून देण्यात आली आहे.
Lava Blaze AMOLED 2 5G मध्ये 6.67-inch full-HD+ AMOLED display आहे. तर 120Hz refresh rate आहे. फोन मध्ये फ्रंट कॅमेरा साठी hole-punch cutout आहे. तर रेअर प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. त्यामध्ये Sony IMX752 sensor आहे. कॅमेरा सोबत LED flash आहे. फोन मधील पुढचा सेल्फी कॅमेरा हा 8MP sensor चा आहे. हा कॅमेरा सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्स साठी आहे.
Lava Blaze AMOLED 2 5G मध्ये MediaTek Dimensity 7060 chipset असून ती 6GB of LPDDR5 RAM आणि 128GB of UFS 3.1 internal storage शी जोडलेला आहे. हा फोन Android 15 वर चालतो. या फोनला 2 वर्षाचे सिक्युरिटी पॅचेस मिळतील तर फोनमधील Android version update त्याला Android 16 प्रमाणे अनुभव देतील.
Lava Blaze AMOLED 2 5G हा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतो जे biometric authentication देणार आहे. याव्यतिरिक्त, ते ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि दीर्घकाळ वापरताना heat management मध्ये मदत करण्यासाठी cooling chamber ने सुसज्ज आहे.
Lava Blaze AMOLED 2 5G मध्ये 33W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे. या स्मार्टफोनची जाडी 7.55 मिमी आणि वजन 174 ग्रॅम आहे.
जाहिरात
जाहिरात