Photo Credit: OnePlus
HMD Fusion यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये IFA 2024 मध्ये समोर आला होता. हा हॅन्डसेट स्मार्ट आऊट्फिट्स सोबत येणार आहे आणि त्यामध्ये इंटरचार्जेबल केसेस असणार आहेत. या हॅन्डसेटला IP52-rated build आहे आणि तो iFixit kit वापरून रिपेअर देखील करता येणार आहे. या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 4 Gen 2 SoC आहे. तर कॅमेरा युनिट मध्ये प्रायमरी कॅमेरा 108-megapixel, 50-megapixel selfie shooter आहे. कंपनीने आता मार्व्हलच्या आगामी Venom: The Last Dance चित्रपटाच्या सहकार्याने फोनच्या स्पेशल एडिशन व्हेरिएंटच्या लाँचची झलक दाखवली आहे.
HMD कडून या स्पेशल एडिशनचा टीझर शेअर केला आहे. हा फोन "the Ultimate Symbiotic Phone." या टॅगलाईनसह आला आहे. Venom edition मध्ये काही डिझाईन आणि एलिमेंट्स सिनेमावर आधारित असणार आहे. अन्य काही फीचर्स पूर्वीच्या फोनप्रमाणेच असणार आहे.
HMD Fusion ची किंमत EUR 249 पासून सुरू होते म्हणजे भारतीय रूपयांमध्ये अंदाजे 24,000 पासून पुढे आहे. या फोनमध्ये 6.56-inch HD+ (720 x 1,612 pixels) display आहे आणि 90Hz refresh rate आहे. हा फोन Android 14 वर चालणारा आहे. हा फोन Snapdragon 4 Gen 2 SoC वर चालणारा असून त्यासोबत 8GB of RAM आणि 256GB onboard storage जोडलेले आहे. हे स्टोरेज microSD card सोबत 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
HMD Fusion च्या कॅमेर्यामध्ये ड्युअल रेअर कॅमेरा युनिट आहे. ज्यात 108-megapixel primary sensor आहे आणि 2-megapixel depth sensor आहे. फ्रंट कॅमेर्यामध्ये 2-megapixel depth sensor आहे. फोनमध्ये 5,000mAh battery आहे. तर फास्ट चार्जिंगसाठी 33W wired सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटीचा विचार करता यामध्ये Bluetooth 5.2, GPS/AGPS, GLONASS, BDS, Galileo, OTG, USB Type-C port, आणि WiFi आहे. सिक्युरिटीच्या दृष्टीने side-mounted fingerprint sensor आहे. व्हॅनिला मॉडेलमध्ये 2 वर्षांच्या OS अपग्रेडसह क्लोज-टू-स्टॉक Android 14 सॉफ्टवेअर आहे.
HMD ने देखील Mattel सोबत येत ऑगस्ट 2024 मध्ये Barbie Phone सादर केला होता. तो फीचर फोन होता पण आता Venom एडिशन हा स्मार्टफोन आहे.
जाहिरात
जाहिरात