Photo Credit: x/@evleaks
मोटोरोला एज ६० स्टायलसमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७-इंचाचा पॉलईडी डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.
Motorola त्यांच्या Edge 60 Stylus model वर काम करत आहे. Lenovo च्या या आगामी स्मार्टफोन बद्दल अद्याप घोषणा झालेली नाही. फोनच्या लॉन्च डेट आणि महत्त्वाच्या स्पेसिफिकेशन बद्दल काही माहिती समोर आली आहे. Motorola Edge 60 Stylus पुढील आठवड्यापासून भारतामध्ये लॉन्च होऊ शकतो. नावामध्ये दिलेल्या माहितीनुसार, फोनमध्ये in-built stylus फीचर असू शकते. Motorola Edge 60 Stylus हा Snapdragon 7s Gen 2 chipset वर चालतो. यामध्ये 5,000mAh battery आहे. stylus variant हा Motorola Edge 60 Fusion चा भाऊ म्हणून Edge 60 Pro, आणि Edge 60सोबत लॉन्च होण्याचा अंदाज आहे.
Tipster Abhishek Yadav च्या माहितीनुसार, Motorola Edge 60 Stylus ची लॉन्च डेट आणि स्पेसिफिकेशन समोर आली आहेत. हा फोन 17 एप्रिलला दाखल होऊ शकतो.
Motorola Edge 60 Stylus हा Android 15 वर चालतो. त्यामध्ये 6.7-inch pOLED display आहे आणि 120Hz refresh rate आहे. हा फोन Snapdragon 7s Gen 2 chipset वर चालतो. फोनच्या कॅमेराचा विचार करता Motorola Edge 60 Stylus हा dual rear camera unit सह 50-megapixel primary sensor आणि 13-megapixel secondary sensor सह चालतो. यामध्ये 32-megapixel selfie camera देखील आहे. Motorola च्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh battery आणि 68W wired fast चार्जिंग आणी 15W wireless charging आहे.
Motorola Edge 60 Stylus हा mid-range हँडसेट म्हणून येणार असल्याची माहिती आहे. मागील लीकनुसार, त्याची किंमत सुमारे EUR 500 (सुमारे 43,600 रुपये) असेल. कथित फोनच्या रेंडरमध्ये डिव्हाइसच्या उजव्या कोपऱ्यात एक बंप दिसत होता, जो इन-बिल्ट स्टायलस सूचित करतो.
कंपनीने अलीकडेच भारतात Motorola Edge 60 Fusionची घोषणा केली आहे. यात MediaTek Dimensity 7400 SoC आहे आणि 8जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज पर्यायाची किंमत22,999 रुपये आहे. कंपनी लवकरच Motorola Edge 60 Stylus, Edge 60 Pro, आणि Motorola Edge 60 ची घोषणा करण्यात आली आहे.
जाहिरात
जाहिरात