कर्व्ह डिस्प्ले, 50MP कॅमेरा, 6720mAh बॅटरी सह येणार मोटोरोला चा नवा स्मार्टफोन Moto G86 Power 5G

Motorola G86 Power 5G च्या बेस व्हेरिएंटची किंमत सुमारे 17 हजार असण्याचा अंदाज आहे. Moto G85 च्या लॉन्च प्राईजप्रमाणेच या नव्या फोनची किंमत असणार आहे.

कर्व्ह डिस्प्ले, 50MP कॅमेरा, 6720mAh बॅटरी सह येणार  मोटोरोला चा नवा स्मार्टफोन Moto G86 Power 5G

Photo Credit: Motorola

मोटो जी८६ पॉवर तीन रंगांमध्ये येईल ज्यामध्ये गोल्डन सायप्रस (चित्रात) समाविष्ट आहे

महत्वाचे मुद्दे
  • फोनच्या फीचर्स मध्ये Dimensity 7400 chip, 6.7-inch AMOLED display, आणि 33
  • Osmic Sky, Golden Cypress, आणि Spellbound रंगांमध्ये Moto G86 Power 5G उ
  • Moto G86 Power 5G हा स्मार्टफोन भारतामध्ये 30 जुलैला लॉन्च होणारआणि Flip
जाहिरात

Moto G96 5G च्या भारतामधील लॉन्च नंतर आता मोटोरोला कडून Motorola G86 Power 5G लॉन्च करण्याची तयारी सुरू झाली आहे. हा फोन मोबाईलच्या बाजारपेठेत मिड रेंज सेगमेंट मध्ये असणार आहे. दरम्यान Motorola G86 Power 5G मध्ये MediaTek Dimensity 7400 असणार आहे. या स्मार्टफोनची मायक्रोसाइट आधीच लाईव्ह आहे जी लाँच तारीख, स्पेसिफिकेशन्स, फर्स्ट लूक आणि बरेच काही यासह प्रमुख तपशीलांची माहिती देत आहे. कंपनीच्या माहितीनुसार, या फोनमध्ये दमदार बॅटरी असणार आहे तर military grade protection, IP68 and IP69 rating असल्याने फोन धूळ, पाण्यापासून सुरक्षित असेल.

Moto G86 Power ची भारतामधील लॉन्च डेट काय?

Flipkart listing वरील माहितीनुसार, Moto G86 Power हा स्मार्टफोन भारतामध्ये 30 जुलै दिवशी लॉन्च होणार आहे. हा फोन 3 रंगांमध्ये उपलब्ध असेल. ज्यामध्ये osmic Sky, Golden Cypress, आणि Spellbound
चा समावेश असणार आहे. हा फोन ग्राहकांना Flipkart, e-store आणि काही निवडक रिटेल पार्टनर्सच्या दुकानांमध्ये विकत घेता येणार आहे.

Moto G86 Power ची स्पेसिफिकेशन्स काय?

मोटोरोला कडून Moto G86 Power ची काही महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये फोन हा MediaTek Dimensity 7400 SoC सह येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा फोन 8GB of LPDDR4x RAM आणि 256GB storage पर्यंत जोडता येणार आहे. हा फोन expandable असणार आहे. फोनमध्ये 6.7-inch AMOLED panel, 120Hz refresh rate, 4,500 nits peak brightness चा समा वेश आहे. फोनमध्ये Gorilla Glass 7i protection देखील आहे. हा फोन 6,720mAh battery सह येणार आहे तर 33W charging support देखील असणार आहे.

फोनमधील कॅमेरा पाहता, तो 50MP main Sony LYT-600 sensor सह असणार आहे. त्यामध्ये 8MP ultrawide sensor आणि flicker sensor देखील असणार आहे. फोनमध्ये सेल्फी साठी, व्हिडिओ कॉल साठी 32MP selfie camera आहे.

Moto G86 Power ची किंमत काय असेल?

Moto G86 Power 5G हा Moto G85 च्या लॉन्च प्राईज च्या आसापास असणार आहे. त्यामुळे या फोनचं बेस व्हेरिएंट अंदाजे 16,999 असण्याचा अंदाज आहे. अद्याप मोटोरोला कडून Moto G86 Power ची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. कर्व्ह डिस्प्ले, 50MP कॅमेरा, 6720mAh बॅटरी सह येणार मोटोरोला चा नवा स्मार्टफोन Moto G86 Power 5G
  2. itel चा सुपर गुरु 4G Max फोन झाला लॉन्च; 13 भाषांमध्ये मिळणार सपोर्ट
  3. Lava Blaze Dragon लवकरच बाजरात येणार नवा 5G फोन दहा हजार पेक्षा कमी किंमतीमध्ये मिळणार
  4. Redmi कडून दोन नवीन फोन लाँच करत 11 व्या वर्षपूर्तीचं स्पेशल सेलिब्रेशन
  5. Asus Vivobook 14 Copilot+ PC भारतात लॉन्च; किंमत 65,990 पासून सुरू
  6. Vodafone Idea चे प्रीपेड युजर्सना दिली खुशखबर; पहा काय खास
  7. अवघ्या 20,000 रूपयांमध्ये Samsung चा प्रीमियम 50MP कॅमेरा फोन आला; पहा फीचर्स
  8. Lava Blaze Dragon सज्ज आहे Snapdragon 4 Gen 2 सह; फोनची किंमतही आवाक्यात
  9. OriginOS ची ग्लोबल लाँचिंग सुरू; Vivo V60 ऑगस्ट महिन्यात भारतात लॉन्च साठी सज्ज
  10. Lava Agni 4 मध्ये काय असू शकतात दमदार फीचर्स घ्या जाणून
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »