OnePlus 13 भारतामध्ये लॉन्चसाठी सज्ज, पहा काय असू शकतात फीचर्स

OnePlus 13 भारतामध्ये लॉन्चसाठी सज्ज, पहा काय असू शकतात फीचर्स

Photo Credit: OnePlus 13

OnePlus 13 आर्क्टिक डॉन, ब्लॅक एक्लिप्स आणि मिडनाईट ओशन शेड्समध्ये येईल

महत्वाचे मुद्दे
  • चीन नंतर OnePlus 13 आता भारतासह ग्लोबल मार्केट मध्ये येणार
  • OnePlus 13 कंपनीच्या वेबसाईट सोबतच अमेझॉन वर खरेदीसाठी उपलब्ध असेल
  • Arctic Dawn, Black Eclipse,आणि Midnight Ocean रंगामध्ये फोन असेल
जाहिरात

चीन मध्ये OnePlus 13 हा स्मार्टफोन ऑक्टोबर महिन्यात Snapdragon 8 Elite SoC आणि 50-megapixel ट्रीपल रेअर कॅमेरा युनिट सह लॉन्च करण्यात आला आहे. आता चीनच्या बाहेर जागतिक बाजारपेठेमध्ये हा फोन लॉन्च होण्याच्या तयारीमध्ये आहे. भारतामध्ये वनप्लस 13 हा स्मार्टफोन जानेवारी महिन्यात ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. अद्याप ठोस तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र चीन प्रमाणेच व्हेरिएंट्स भारतासह जगात अन्य ठिकाणी देखील लॉन्च केले जातील अशी आशा आहे. भारतात या स्मार्टफोनच्या उपलब्धतेबद्दल माहिती देण्यात आली आहे.

भारतात अमेझॉन वर उपलब्ध असेल OnePlus 13

OnePlus 13 भारतामध्ये अमेझॉन वर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. सोबतच हा फोन OnePlus India website च्या वेबसाईट वर देखील उपलब्ध असणार आहे. यासाठी लाईव्ह मायक्रोसाईट देखील सुरू करण्यात आली आहे. हा फोन Android 15-based OxygenOS 15 वर चालणार आहे. या फोनमध्ये AI-backed imaging आणि note-taking features असणार आहेत. चीन मध्ये उपलब्ध असलेल्या व्हेरिएंट्स प्रमाणेच हा फोन भारतामध्येही उपलब्ध आहे.

OnePlus 13 ची स्पेसिफिकेशन्स काय?

चीन मध्ये OnePlus 13 लॉन्च झाला तेव्हा त्याची स्क्रीन 6.82-inch Quad-HD+ LTPO AMOLED देण्यात आली आहे. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz असणार आहे आणि Dolby Vision support आहे. यामध्ये Snapdragon 8 Elite SoC असणार आहे जो 24GB of LPDDR5X RAM आणि 1TB of UFS 4.0 onboard storage असणार आहे. फोन Android 15-based ColorOS 15 असणार आहे. हा फोन IP68+69 रेटेड असणार आहे ज्यामुळे फोनचं संरक्षण धूळ आणि पाण्यापासून होणार आहे.

कॅमेरा पाहता यामध्ये 50 megapixel primary sensor आहे जो OIS सह आहे. 50-megapixel sensor सह ultrawide lens आहे. तसेच 50-megapixel periscope telephoto shooter आहे. यासोबत 3x optical zoom आहे. फोनमध्ये 32-megapixel selfie shooter देखील आहे.

वनप्लस 13 मध्ये 6,000mAh बॅटरी आहे. यासोबत 100W wired आणि 50W wireless, 5W reverse wired आणि 10W reverse wireless charging सपोर्ट आहे. सुरक्षेचा विचार करता, यामध्ये in-display ultrasonic fingerprint scanner आहे.

चीन मध्ये OnePlus 13 ची किंमत CNY 4,499 म्हणजे अंदाजे किंमत 53,100 रूपये आहे. ही किंमत 12GB + 256GB व्हेरिएंट साठी आहे. ग्लोबल व्हर्जन साठी हा स्मार्टफोन Arctic Dawn, Black Eclipse,आणि Midnight Ocean रंगामध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये मागच्या बाजूला vegan leather finish असणार आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »