Photo Credit: Oneplus
OnePlus 13 चीन मध्ये महिना अखेरीस लॉन्च होण्याची तयारीमध्ये आहे. मागील काही महिन्यांपासून या फोनबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या पण आता अखेर कंपनी कडून त्याची लॉन्च डेट आणि डिझाईन, रंग जाहीर करण्यात आले आहेत. दरम्यान हा वन प्लस 13 मोबाईल ई स्पोर्ट इव्हेंट मध्येही चीन मध्ये दिसला होता. या फोन मध्ये BOE X2 display असणार असल्याची चर्चा आहे.
वनप्लस कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांच्या फ्लॅगाशीप मधील हा मोबाईल 31 ऑक्टोबरला चीनमध्ये संध्याकाळी 4 वाजता लॉन्च केला जाणार आहे. या फोनमध्ये सिस्टिम अपग्रेड केलेली असेल, खेळ खेळताना त्याचा अनुभव चांगला असेल आय प्रोटेक्शन सह स्क्रीन डिस्प्ले असणार आहे. फोनची बॅटरी लाईफ आणि चार्जिंग उत्तम असणार आहे.
OnePlus 13 हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. तो निळा, काळा आणि पांढर्या रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. OnePlus 13 च्या कॅमेरा मॉड्युल मध्ये थोडे बदल करण्यात आले आहे. कॅमेरा हा स्मार्टफोनच्या फ्रेमपासून वेगळा करण्यात आला आहे.
चायनीज सोशल मीडीया प्लॅटफॉर्म Weibo वर अनेकांनी केलेल्या पोस्ट मध्ये युजर्सनी दावा केला आहे की चीनमध्ये आयोजित Peacekeeper Elite 2024 इव्हेंटमध्ये ई-स्पोर्ट्स खेळाडूंच्या हातात OnePlus 13 दिसला आहे.
वनप्लस 13 मध्ये 6.82-inch 2K 10-bit LTPO BOE X2 micro quad curved OLED स्क्रीन आहे. त्यामध्ये 20Hz refresh rate आहे. या स्मार्टफोन मध्ये आगामी Snapdragon 8 Elite chipset असणार आहे. तर यासोबत 24 जीबी रॅम असणार आहे आणि 1 टीबी पर्यंत स्टोरेज असनार आहे. फोनमध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा सेटअप असणार आहे. यास्मार्टफोनमध्ये 50 megapixel Sony LYT-808 primary sensor असणार आहे. 50-megapixel ultra-wide angle unit असणार आहे तर 50-megapixel periscope telephoto lens असणार आहे ज्यात 3x optical zoom असेल. फोनमध्ये 6,000mAh बॅटरी असणार आहे तर 100W fast charging (wired) चा सपोर्ट असणार आहे.
जाहिरात
जाहिरात