OnePlus 13, OnePlus 13R झाला लॉन्च पहा या स्मार्टफोन्सची फीचर्स, स्पेसिफिकेशन्स सह किंमत काय?

OnePlus 13 ची भारतामध्ये किंमत 69,999 पासून सुरू होते. हा फोन 12GB RAM + 256GB storage, 16GB RAM + 512GB आणि 24GB + 1TB या व्हेरिएंट मध्ये आहे

OnePlus 13, OnePlus 13R झाला लॉन्च पहा या स्मार्टफोन्सची फीचर्स, स्पेसिफिकेशन्स सह किंमत काय?

Photo Credit: X/OnePlus

OnePlus 13 सिरीजमध्ये 100W पर्यंत चार्जिंगसाठी सपोर्ट असलेल्या 6,000mAh बॅटरी आहेत

महत्वाचे मुद्दे
  • OnePlus 13 ची भारतामध्ये किंमत 69,999 पासून सुरू होते तर OnePlus 13R ची
  • OnePlus 13 हा पहिलाच फोन आहे ज्यामध्ये Snapdragon 8 Elite chipset चा समाव
  • फोनच्या Standard model मध्ये ultrasonic fingerprint sensor मिळणार
जाहिरात

OnePlus 13 आणि OnePlus 13R मंगळवारी भारतासह ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च झाला अअहे. नवा वनप्लस मोबाईल हा Snapdragon chipsets सह आला आहे तर 6,000mAh बॅटरीचा त्यात समावेश आहे. त्याला 100W चार्जिंगचा सपोर्ट आहे. फोनमध्ये triple rear camera units आहे यामध्ये 50-megapixel primary sensor आहे. दरम्यान OnePlus 13 चीन मध्ये ऑक्टोबर महिन्यात मागील महिन्यात लॉन्च झाला आहे. हा पहिला फोन आहे ज्यामध्ये Snapdragon 8 Elite chipset चा समावेश आहे. OnePlus 13R हा OnePlus Ace 5 चा ग्लोबल व्हर्जन आहे.

OnePlus 13 ची भारतामध्ये किंमत 69,999 पासून सुरू होते. हा फोन 12GB RAM + 256GB storage, 16GB RAM + 512GB आणि 24GB + 1TB या व्हेरिएंट मध्ये आहे. दरम्यान हा स्मार्टफोन Arctic Dawn, Black Eclipse, आणि Midnight Ocean या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

OnePlus 13R ची भारतामध्ये किंमत 42,999 पासून सुरू होते. त्यामध्ये 12GB+256GB version, 16GB+512GB व्हेरिएंट आहे. तर हा फोन Astral Trail, Nebula Noir रंगांमध्ये उपलब्ध आहे.

OnePlus 13 ची स्पेसिफिकेशन्स काय?

OnePlus 13 मध्ये ड्युअल सीम आहे. हा फोन Android 15-based OxygenOS 15.0 वर चालतो. त्यामध्ये 6.82-inch Quad-HD+ स्क्रीन आहे. डिस्प्ले ला Dolby Vision support आणि ceramic guard protection आहे. हा फोन Snapdragon 8 Elite chipset सह आला आहे.

OnePlus 13 मध्ये Hasselblad-branded triple rear camera setup आहे. ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50-megapixel Sony LYT-808 sensor चा आहे. सोबत 50-megapixel S5KJN5 ultra-wide camera आहे आणि 50-megapixel Sony LYT-600 periscope telephoto camera आहे ज्यात 3x optical zoom आहे . फ्रंटला 32-megapixel Sony Sony IMX615 camera आहे. फोनला बाजूला alert slider आहे.

OnePlus 13R ची स्पेसिफिकेशन्स

OnePlus 13R देखील ड्युअल सीम फोन आहे. Android 15 with OxygenOS 15.0 वर चालणार्‍या या फोनची स्क्रीन 6.78-inch full-HD+ आहे. डिस्प्लेला Corning Gorilla Glass 7i protection आहे. Snapdragon 8 Gen 3 chipset वर हा फोन चालतो तर 16GB RAM आणि 512GB of onboard storage चा त्यामध्ये पर्याय आहे. OnePlus 13R मध्येही triple rear camera setup आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. TENAA लिस्टिंगमध्ये समोर आले Moto G36 चे डिझाईन व स्पेसिफिकेशन्स
  2. Poco F7 5G ची किंमत फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये घसरली; पहा आता किंमत काय
  3. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 मध्ये इको डिव्हाइस वर मिळणार मोठी सूट
  4. Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये सोनी, सॅमसंग, TCL स्मार्ट टीव्हीवर आकर्षक डील्स जाहीर
  5. ॲपलकडून iOS 26 अपडेटसह iPadOS 26 व macOS Tahoe लॉन्च; पहा पात्र डिव्हाईसची यादी
  6. : Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स
  7. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Nothing Phone 3 अवघ्या 34,999 रूपयांत विकत घेण्याची संधी
  8. Realme P3 Lite 5G भारतात लॉन्च; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय
  9. iQOO 15 मध्ये 2K Samsung AMOLED डिस्प्ले; समोर आली माहिती
  10. Realme चा नवा P-Series स्मार्टफोन P3 Lite 5G आला दमदार फीचर्स आणि किफायतशीर किंमतीमध्ये
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »