OnePlus 13R बाबत समोर आले महत्त्वाचे अपडेट्स; पहा काय असू शकतात फीचर्स

OnePlus 13R मध्ये 6.78-inch AMOLED display आणि 120Hz refresh rate असणार आहे.

OnePlus 13R बाबत समोर आले महत्त्वाचे अपडेट्स; पहा काय असू शकतात फीचर्स

Photo Credit: OnePlus

OnePlus 12R मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 SoC हुड अंतर्गत आहे

महत्वाचे मुद्दे
  • फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 chipset असणार
  • OnePlus 13R मध्ये लॉन्चच्या वेळेस 12GB RAM आणि 256GB storage सह येणार
  • OnePlus 13R हा पूर्वीच्या OnePlus 12R च्या तुलनेत थोडा छोटा आणि कमी जाडी
जाहिरात

OnePlus 13R हा स्मार्टफोन जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत लॉन्च होण्याच्या तयारीमध्ये आहे. अद्याप या फोनची अधिकृत घोषणा झालेली नाही पण या फोनच्या महत्त्वाच्या स्पेसिफिकेशनची चर्चा ऑनलाईन माध्यमातून सुरू झाली आहे. OnePlus 13R मध्ये 6.78-inch AMOLED screen आणि triple rear camera unit आहे. त्यामध्ये 50-megapixel main camera असणार आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 chipset असणार अशी माहिती समोर आलेली आहे तर फोनमध्ये 6,000mAh बॅटरी असणार आहे.

OnePlus 13R मध्ये काय असू शकतात स्पेसिफिकेशन्स?

Tipster Steve H.McFly (@OnLeaks)च्या माहितीनुसार, OnePlus 13R मध्ये 6.78-inch (1,264x2,780 pixels) AMOLED display असेल तर 120Hz refresh rate आणि 450ppi pixel density असणार आहे. ही स्क्रिन देखील OnePlus 12R प्रमाणेच असणार आहे. यामध्ये Snapdragon 8 Gen 3 SoC चीपसेट असणार आहे तर फोन Android 15-based OxygenOS 15.0 वर चालणार आहे.

OnePlus 13R मध्ये लॉन्चच्या वेळेस 12GB RAM आणि 256GB storage सह येणार आहे. हा फोन Astral Trail आणि Nebula Noir रंगामध्ये असणार आहे. OnePlus कडून अजून एक रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट सह येण्याचा अंदाज आहे. तर अजून रंग देखील मिळतील.

फोनमधील कॅमेराचा विचार करता OnePlus 13R मध्ये ट्रिपल rear camera आहे. 50-megapixel primary sensor ज्यामध्ये f/1.8 aperture, 8-megapixel sensor ज्यामध्ये f/2.2 aperture आणि 50-megapixel sensor ज्यामध्ये f/2.0 aperture असणार आहे.

फोनचा फ्रंट कॅमेरा पाहता OnePlus 13R मध्ये 16-megapixel camera with f/2.4 aperture आहे. यासोबत फोनमध्ये 6,000mAh बॅटरी असणार आहे आणि 80W fast charging support असणार आहे.

नुकत्याच लॉन्च OnePlus 13 मध्ये सारख्याच क्षमतेची बॅटरी आहे. कनेक्टीव्हिटी साठी Bluetooth 5.4, NFC, USB Type-C आणि Wi-Fi 802.11 a/b/g/n/ac/ax/be आहे. यामध्ये in-display optical fingerprint sensor आहे. तर Infrared blaster आहे.

OnePlus 13R हा पूर्वीच्या OnePlus 12R च्या तुलनेत थोडा छोटा आणि कमी जाडीचा असणार आहे. हा फोन 161.72 x 75.77 x 8.02mm आकाराचा असणार आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. फोल्ड डिझाइनचा सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल; पहा फीचर्स
  2. Samsung Galaxy Z Fold 7 भारतात लॉन्च; इथे पहा किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स
  3. Galaxy Buds 3 Pro वर Amazon Prime Day सेलमध्ये मोठा डिस्काउंट जाहीर
  4. Amazon Prime Day 2025 मध्ये iQOO स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स जाहीर; पहा अपडेट्स
  5. 14 जुलै ला लॉन्च होणार्‍या Vivo X Fold 5 आणि X200 FE च्या किंमती इंटरनेट वर लीक
  6. आयफोनही आता येणार दमदार बॅटरीज सोबत; पहा iPhone 17 Pro Max बद्दलची अपडेट
  7. Honor X9c 5G भारतात 7 जुलै येतोय; 12 जुलै पासून विक्री होणार Amazon वर सुरू
  8. Amazon चा 72 तासांचा Prime Day सेल जाहीर; पहा स्मार्टफोन सह कोणत्या वस्तूंवर मिळणार सूट
  9. Nothing Headphone (1) भारतात लॉन्च; पहा प्रीमियम फीचर्स, किंमत इथे
  10. Nothing Phone (3) भारतात अखेर आलाच; किंमत ₹79,999 पासून सुरू
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »