भारतात OnePlus 15R ची अधिकृत किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. पण अहवालानुसार या स्मार्टफोनची किंमत 45,999 ते 49,999 रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.
Photo Credit: OnePlus
या हँडसेटमध्ये फ्लॅगशिप वनप्लस १५ सारखाच कॅमेरा डेकोरेशन असल्याचे दिसते
OnePlus 15 च्या पर्दापणानंतर आता कंपनीने आता भारतात लॉन्च होणारा त्यांचा आगामी OnePlus 15R ची घोषणा केली आहे. OnePlus 15 series मध्ये सहभागी होणारा आता हा अजून एक फोन असेल. OnePlus India website वर आता या फोनसाठी एक खास पेज लाईव्ह करण्यात आले आहे. ज्यामध्ये हा फोन OxygenOS 16 based on Android 16 वर चालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. OnePlus 15R हा OnePlus Ace 6 चा रिब्रॅन्डेड फोन असल्याची माहिती देण्यात आली आहे. जो नुकताच चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. अद्याप OnePlus कडून भारतात हा फोन नेमका कधी लॉन्च होणार याची नेमकी तारीख जाहीर केलेली नाही. मात्र रिपोर्ट्सनुसार हा फोन डिसेंबर महिन्याच्या मध्यामध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. अजूनही त्याचे स्टेटस “Coming Soon” दाखवले जात आहे.
OnePlus 15R मध्ये 6.83-inch LTPS AMOLED display सह 1.5K resolution आणि 165Hz refresh rate चा समावेश आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite processor चा समावेश आहे. जो LPDDR5X Ultra RAM आणि UFS 4.1 storage सोबत जोडलेला आहे. या फोनमध्ये 7,800 mAh बॅटरीचा समावेश आहे जो 120W फास्ट चार्जिंग सोबत जोडलेला आहे. फोटोग्राफीसाठी OnePlus 15R मध्ये 50MP Sony IMX906 main camera, मागील बाजूस 8MP ultrawide sensor चा समावेश आहे तर फ्रंटला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8MP ultrawide sensor चा समावेश आहे.
इतर अपेक्षित फीचर्समध्ये Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC,ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर यांचा समावेश आहे. तसेच, OnePlus 15R मध्ये धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68, IP69 आणि IP69K रेटिंग मिळण्याची अपेक्षा आहे.
भारतात OnePlus 15R ची अधिकृत किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. पण अहवालानुसार या स्मार्टफोनची किंमत 45,999 ते 49,999 रुपयांच्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. टीझर इमेजमध्ये OnePlus 15R चे दोन रंग समोर आले आहेत ज्यामध्ये काळा आणि हिरवा रंगाचा समावेश आहे. या फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप दिसतो जो उभा असून, चौकोनी कॅमेरा डेकोरेशनमध्ये ठेवला आहे. हा फ्लॅगशिप OnePlus 15 सारखाच आहे.
जाहिरात
जाहिरात
Tecno Pop X Launched in India With 5,000mAh Battery, IP64 Rating: Price, Specifications