OnePlus 15s हा फोन Snapdragon 8 Elite Gen 5 chipset वर चालणार आहे.
Photo Credit: Apple
OnePlus 13s (वरील) भारतात चीनमधील खास OnePlus 13T च्या रीब्रँडेड आवृत्ती म्हणून रिलीज करण्यात आला
OnePlus आता OnePlus 15 हा त्यांचा आगामी स्मार्टफोन चीन आणि ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ग्लोबल मार्केट मध्ये भारताचा देखील समावेश आहे. सध्या बाजारात OnePlus 15s फोनची चर्चा सुरू झाली आहे. OnePlus 13s चा उत्तराधिकारी म्हणून OnePlus 15s कडे पाहिले जात आहे. आगामी नव्या स्मार्टफोनमध्ये त्याच्या आधीच्या मॉडेलपेक्षा अनेक अपग्रेड्स आणण्याची शक्यता आहे. आता, लाँच टाइमलाइन आणि प्रमुख फीचर्स ऑनलाइन माध्यमातून समोर आली आहेत. OnePlus 15s हा OnePlus 15T च्या रिब्रँडेड व्हर्जेनच्या स्वरूपात येऊ शकतो, जो कदाचित चीनपुरता मर्यादित असेल. अशी माहिती समोर आली आहे. आता पहा या फोनबद्दलचे अपडेट्स काय?
OnePlus 15s हा फोन Snapdragon 8 Elite Gen 5 chipset वर चालणार आहे. ही चीपसेट नवीन आहे. OnePlus 13s मध्ये आढळणाऱ्या Snapdragon 8 Elite पेक्षा जास्त अपग्रेड असेल. आगामी कॉम्पॅक्ट फ्लॅगशिप अनेक स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येण्याची अपेक्षा आहे, या फोनचे विशिष्ट कॉन्फिगरेशन अद्याप उघड झालेले नाहीत.
ऑनलाईन लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus 15s मध्ये गोलाकार कोपऱ्यांसह 6.3-इंचाचा फ्लॅट AMOLED डिस्प्ले असेल. यात 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000 mAh+ बॅटरी असेल असे सांगण्यात आले आहे जे OnePlus 13s वर देण्यात आलेल्या 5,850 mAh बॅटरी आणि 80W चार्जिंगपेक्षा लक्षणीय वाढ असेल. याव्यतिरिक्त, पुढच्या पिढीतील कॉम्पॅक्ट फोनमध्ये मिनिमलिस्ट कॅमेरा मॉड्यूल डिझाइन, अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि मेटल मिड-फ्रेम असण्याची शक्यता आहे. पण फोनमधील कॅमेरा स्पेसिफिकेशन अद्याप गुलदस्त्यात आहेत, येत्या काही दिवसांत अधिक तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, OnePlus 15s पुढील वर्षी मार्च ते एप्रिल दरम्यान लाँच होण्याची अपेक्षा आहे. कंपनीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
OnePlus ने त्यांचा OnePlus 13s हा स्मार्टफोन 2025 च्या जूनमध्ये बाजारात आला होता. त्याची किंमत 54,999 रुपये आहे आणि 12GB + 256GB RAM आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन आहे. हा फोन ब्लॅक वेल्वेट, ग्रीन सिल्क आणि पिंक सॅटिन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट SoC वर चालतो जो 12GB RAM आणि 512GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो. या फोनमध्ये साउंड प्रोफाइलमध्ये स्विच करण्यासाठी, AI फीचर्स लाँच करण्यासाठी, कॅमेरा अॅक्सेस करण्यासाठी किंवा फ्लॅशलाइट चालू करण्यासाठी कस्टमाइज करण्यायोग्य प्लस की आहे.
जाहिरात
जाहिरात