Photo Credit: OnePlus
OnePlus Ace 5 आणि OnePlus Ace 5 Pro याबद्दल मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अद्याप कंपनीने या मोबाईल्सच्या लाइनअप बद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. या मोबाईल बद्दल लीक झालेल्या नव्या माहितीनुसार, vanilla model आता चीन मध्ये पुढील महिन्यात लॉन्च होणार आहे. OnePlus Ace 5 मध्ये 1.5K resolution display आहे. हा मोबाईल Snapdragon 8 Gen 3 SoC chipset वर चालणार आहे. OnePlus Ace 5 हा फोन चीनच्या बाहेर OnePlus 13R सोबत येणार असल्याची माहिती समोर येत आहे.Digital Chat Station ने Weibo वर केलेल्या पोस्ट नुसार, OnePlus Ace 5 हा मोबाईल चीन मध्ये डिसेंबर महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. OnePlus 13R भारतासह ग्लोबल मार्केट मध्ये OnePlus Ace 5 चा रिब्रॅन्डेड फोन म्हणून येणार आहे. हा फोन जानेवारी महिन्यात लॉन्च होण्याचा अंदाज आहे.
OnePlus Ace 3 हा फोन चीन मध्ये जानेवारी महिन्यात समोर आला होता. ग्लोबल मार्केट मध्ये हा मोबाईल फोन OnePlus 12R म्हणून समोर येणार आहे.
फोनच्या लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus Ace 5 या फोन मध्ये 6.78-inch BOE X2 8T LTPO डिस्प्ले असणार आहे तर 1.5K resolution आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Gen 3 chip असणार आहे. या हॅन्डसेट मध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. तर फोन मध्ये 50 megapixel main camera आहे.
OnePlus Ace 5 मध्ये 16-megapixel selfie shooter असणार आहे. या फोनमध्ये अलर्ट स्लायडर आहे. तर 6,300mAh बॅटरी आणि 100W fast charging support आहे.
OnePlus Ace 5 Pro हा फोन नव्या Snapdragon 8 Elite chipset वर चालणार आहे. यामध्ये 6,500mAh बॅटरी आणि 100W fast charging support आहे. प्रो मॉडेल हा विशेषतः चायनीज मार्केट मध्ये असणार आहे.
जाहिरात
जाहिरात