OnePlus Turbo 6V तीन तर OnePlus Turbo 6 चार व्हेरिएंट्स मध्ये लॉन्च करण्यात आले आहेत.
Photo Credit: OnePlus
वनप्लस टर्बो ६ व्ही हा फोन फियरलेस ब्लू, लोन ब्लॅक आणि नोव्हा व्हाईट (अनुवादित) रंगांमध्ये लाँच करण्यात आला आहे.
OnePlus Turbo 6 आणि Turbo 6V चीनमध्ये 8 जानेवारीला लॉन्च झाले आहेत. हे नवीन स्मार्टफोन विविध रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहेत आणि त्यांना 9,000mAh बॅटरी युनिट्सचा सपोर्ट आहे. OnePlus Turbo 6 मध्ये Snapdragon 8s Gen 4 SoC आहे, तर OnePlus Turbo 6V मध्ये Snapdragon 7s Gen 4 चिपसेट आहे. दोन्ही फोनमध्ये धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंग आहे. ते 16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेजसह सुसज्ज आहेत. चीनमध्ये सध्या या दोन्हींची विक्री 9 जानेवारीपासून सुरू होईल.
OnePlus Turbo 6 हा ColorOS 16 based on Android 16 वर चालतो. त्यामध्ये 6.78-inch full-HD+ (1,272x 2,772 pixels) flexible AMOLED display असून refresh rate हा 60Hz ते 165Hz आहे. फोनमध्ये Snapdragon 8s Gen 4 SoC चा समावेश आहे जो Adreno 825 GPU सोबत येतो. OnePlus Turbo 6 मध्ये 16GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज आहे. यात ड्युअल रिअर कॅमेरा युनिट आहे. यामध्ये 50 MP वाइड-अँगल मेन सेन्सर, फ्रंट कॅमेरा 16 MP आहे. OnePlus Turbo 6 मध्ये 9,000mAh बॅटरी आहे जी 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते.
रॅम + स्टोरेज व्हेरिएंट किंमत
12GB RAM + 256GB स्टोरेज CNY 2,099
12GB RAM + 512GB स्टोरेज CNY 2,399
16GB RAM + 256GB स्टोरेज CNY 2,599
16GB RAM + 512GB स्टोरेज CNY 2,899
OnePlus Turbo 6V मध्ये OnePlus Turbo 6 मॉडेल प्रमाणेच सिम, सॉफ्टवेअर, डिस्प्ले, IP रेटिंग आहेत. OnePlus Turbo 6V हा Snapdragon 7s Gen 4 चिपसेटसह Adreno 810 GPU, 12GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजवर चालतो. यात 6.78-इंचाचा फुल HD+ (1,272x2,772 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे. OnePlus Turbo 6V मध्ये ड्युअल रियर कॅमेरा युनिट आहे ज्यामध्ये 50 MP वाइड-अँगल मेन कॅमेरा आणि 2 MP मोनोक्रोम लेन्स आहे. सेल्फी साठी,16 MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा आहे.
रॅम + स्टोरेज व्हेरिएंट किंमत
8GB RAM + 256GB स्टोरेज CNY 1,699
12GB RAM + 256GB स्टोरेज CNY 1,899
12GB RAM + 512GB स्टोरेज CNY 2,199
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात