Photo Credit: Oppo
Oppo सध्या तीन स्मार्टफोन मॉडेल्सवर काम करत आहेत. या फोनमधील बॅटरीज अधिक क्षमतेच्या असणार आहे. 2024 मध्ये आता 6000mAhच्या बॅटरीजचे फोन आले आहेत. यासोबतच काही मोबाईल मध्ये सिलिकॉन कार्बन बॅटरीज देखील बघायला मिळाल्या आहेत. tipster च्या माहितीनुसार, चायनीज फोन मेकर कंपनी सध्या 2 फोन बनवण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये 7,000mAh बॅटरीज असण्याचा अंदाज आहे. सध्या रिपोर्ट्सनुसार अजून एक कंपनी पुढील महिन्यात 7,000mAh बॅटरीसह मोबाईल लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये आहे.
tipster Digital Chat Station च्या शेअर केलेल्या माहितीप्रमाणे, Weibo च्या पोस्ट मध्ये त्यांनी नव्या हाय परफॉर्मन्स फोन मध्ये अधिक क्षमतेच्या बॅटरीज असणार आहेत. युजर्सने विकसित होत असलेल्या तीन हँडसेटची माहिती लीक केली आहे आणि तिन्ही मॉडेल्स सध्याच्या फ्लॅगशिप लाइनअपपेक्षा जास्त क्षमतेच्या बॅटरीसह सुसज्ज आहेत.
टिपस्टरने माहिती दिलेल्या तीन स्मार्टफोनपैकी पहिला स्मार्टफोन 6,285mAh बॅटरी (किंवा 6,400mAh) सह असू शकतो. तर कंपनीकडून अजून एका मोबाईल वर काम सुरू असून त्यामध्ये 6,850mAh battery चा समावेश आहे. या दोन्ही मॉडेल्स मध्ये 80W charging चा सपोर्ट असणार आहे.
टिपस्टर च्या माहितीनुसार, तिसरा स्मार्टफोन हा ड्युअल सेल 6,140mAh battery सह असणार आहे. पहिल्या दोन मोबाईलच्या तुलनेत हा स्मार्टफोन कमी क्षमतेचा आहे. यामध्ये 100W charging support आहे.
सध्याच्या रिपोर्ट्सनुसार, स्मार्टफोन हा 7,000mAh बॅटरी सह डिसेंबर महिन्यात लॉन्च होणार आहे. Realme कडून Realme Neo 7 हा डिसेंबर 11 दिवशी लॉन्च होत आहे. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, फोनमध्ये MediaTek Dimensity 9300+ chip आहे आणि बॅटरी 7,000mAH ची आहे.
अधिक क्षमतेच्या बॅटरींनी सुसज्ज असलेल्या कोणत्याही येत्या स्मार्टफोन्सबद्दल Oppo कडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे या दाव्यांवर अजूनही पूर्णपणे विश्वास ठेवू नका. अजून रिलीज न झालेल्या स्मार्टफोन्सचे तपशील शेअर करण्याच्या बाबतीत टिपस्टरचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, त्यामुळे येत्या काही महिन्यांत या हँडसेटबद्दल अधिक अपडेट्स येऊ शकतात.
जाहिरात
जाहिरात