Oppo A5 Pro 5G मध्ये काय खास? किंमत काय? पहा ऑनलाईन लीक झालेले अपडेट्स

Oppo A5 Pro 5G मध्ये काय खास? किंमत काय? पहा ऑनलाईन लीक झालेले अपडेट्स

Photo Credit: Oppo

Oppo A5 Pro 5G ला IP69 धूळ आणि पाणी प्रतिरोधक रेटिंग मिळेल

महत्वाचे मुद्दे
  • Oppo A5 Pro 5G भारतामध्ये 24 एप्रिलला येणार आहे
  • हा फोन Oppo A5 Pro 5G,च्या ग्लोबल व्हर्जन प्रमाणेच आहे
  • ppo A5 Pro 5G ची भारतामधील किंमत Rs. 17,999 आहे
जाहिरात

Oppo A5 Pro 5G भारतामध्ये 24 एप्रिलला येणार आहे. हे OPPO च्या A Series lineup मधील नवीन डिव्हाईस आहे. Oppo A5 Pro 5G या फोनच्या लॉन्च पूर्वी फोनच्या किंमतीबद्दल काही अंदाज ली झाले आहेत. या स्मार्टफोनचे काही महत्त्वाचे फीचर्स देखील समोर आले आहेत. हा फोन Oppo A5 Pro 5G,च्या ग्लोबल व्हर्जन प्रमाणेच आहे. या वर्षाच्या सुरूवातीला जगात तो काही बाजारपेठांमध्ये उपलब्ध करण्यात आला होता. या फोनचं डिझाईन आणि स्पेसिफिकेशन हे चीन मधील व्हेरिएंट पेक्षा वेगळे आहे. जो डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च करण्यात आला होता.Oppo A5 Pro 5G ची भारतामध्ये काय असू शकते किंमत?Oppo A5 Pro 5G ची भारतामधील किंमत Rs. 17,999 आहे. ही किंमत 8GB + 128GB या व्हेरिएंट साठी आहे. तर 8GB + 256GB variant ची किंमत Rs. 19,999 आहे. अशी माहिती 91Mobiles Hindi च्या रिपोर्ट मध्ये सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे.

A5 Pro 5G च्या भारतीय व्हर्जन मध्ये IP69 रेटिंग असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. यामध्ये OPPO ज्याला “Damage-Proof 360° Armour Body,”म्हणते ते समाविष्ट आहे, जे विविध कोनातून येणाऱ्या थेंबांना प्रतिकार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,800mAh battery आहे तर 45W charging support आहे. Oppo A5 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 6300 SoC आहे जी 12GB of LPDDR4X RAM आणि 256GB of UFS 2.2 onboard storage सह जोडलेली आहे. ColorOS 15.0 based on Android 15 सोबत हा फोन येणार आहे.

फोनमधील कॅमेरा पाहता Oppo A5 Pro 5G global variant मध्ये 50-megapixel main rear sensor आहे. ज्यासोबत OIS आहे. तर 2-megapixel sensor आहे. फोन मध्ये फ्रंट कॅमेरा 8-megapixel sensor चा आहे. सोबतच फोनमध्ये 6.67-inch HD+ (720x1,604 pixels) LCD screen आहे. फोनमध्ये Corning Gorilla Glass 7i protection आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे चीनमधील Oppo A5 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 7300 SoC, 16-मेगापिक्सेल सेल्फी शूटर, 6.7-इंच 120Hz फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आणि 80W पर्यंत वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »