Photo Credit: Poco
Poco C75 हा नवा स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये पुढील आठवड्यात लॉन्च होण्यासाठी सज्ज झाला आहे. Poco कडून त्याचं पोस्टर X वर शेअर करत त्याचं डिझाईन आणि स्पेसिफिकेशन याची माहिती देण्यात आली आहे. हा कंपनीचा C series मधील नवा स्मार्टफोन आहे. या फोनच्या खरेदीसाठी early bird pricing जाहीर करण्यात आले आहे. Poco C75 मध्ये 50-megapixel ड्युअल कॅमेरा आहे. तर फोनमध्ये 5,160mAh बॅटरी आहे. हा फोन Redmi 14C चा रिब्रॅन्ड करून समोर आणण्यात आलेला फोन आहे. हा फोन दोन रॅम आणि स्टोरेज कॉन्फ्युगरेशन वर आधारित फोन आहे.
Poco C75 हा स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये 25 ऑक्टोबरला लॉन्च होत आहे. त्यामुळे आता हा फोन भारतामध्येही उपलब्ध होणार आहे.Poco C75 यामध्ये 6.88-inch display आहे. फोनची बॅटरी 5,160mAh आहे. या फोनमध्ये dual rear camera युनिट आहे. ज्यामध्ये main sensor हा 50-megapixel आहे.
सुरूवातीला फोन खरेदी करणार्यांसाठी जाहीर केलेल्या किंमतीनुसार, Poco C75 हा स्मार्टफोन $109म्हणजेच भारतीय रूपयांनुसार अंदाजे 9100 रूपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. हा फोन 6GB RAM + 128GB storage सह असणार आहे. तर 8GB RAM + 256GB storage च्या फोनसाठी $129 म्हणजेच अंदाजे 10 हजार रूपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान ही किंमत सुरूवातीला फोन लॉन्चच्या वेळी मर्यादित काळासाठीच लागू असणार आहे.
Poco C75 तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. ज्यात काळा, सोनेरी आणि हिरव्या रंगाचा समावेश असेल. फोनवरील गोलाकृती रेअर कॅमेरा मॉड्युल हे Redmi 14C च्या डिझाईनची आठवण करून देणारे आहे.
Redmi 14C प्रमाणेच Poco C75या स्मार्टफोनमध्येही MediaTek Helio G85 SoC असणार आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 13-megapixel front-facing camera आहे. 18W charging supportसह हा फोन असून यामध्येही side-mounted fingerprint sensor आहे. हा स्मार्टफोन बजेट सेगमेंट मधील फोन आहे. हा फोन केवळ 4G connectivity सह येणार आहे.
जाहिरात
जाहिरात