Photo Credit: Poco
Poco M7 Pro 5G आणि Poco C75 5G भारतामध्ये येत्या काही आठवड्यांमध्ये लॉन्च होणार आहे. Poco कडून लॉन्चच्या तारखेसह आता काही महत्त्वाची फीचर्स देखील जाहीर करण्यात आली आहे. Poco C-series smartphone मध्ये Sony camera येणार आहे तर Poco M7 Pro 5G मध्ये AMOLED display आहे. हे दोन्ही फोन फ्लिपकार्ट वर उपलब्ध असणार आहेत. नवे Poco C75 5G हा फोन बजेट मध्ये असणार आहेत तर त्यामध्ये Snapdragon 4s Gen 2 SoC देखील असणार आहे. Poco C75 5G हा भारतामधील सर्वात किफायतशीर 5G smartphone असणार आहे ज्यामध्ये Sony sensor देखील असणार आहे.
Poco India चे प्रमुख Himanshu Tandon यांनी X वर Poco M7 Pro 5G आणि Poco C75 5G बाबत टीझर शेअर केले आहेत. हे स्मार्टफोन 17 डिसेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून उपलब्ध होणार आहेत.
Poco M7 Pro 5G मध्ये AMOLED display असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर Poco C75 5G मध्ये Sony camera आहे. हा फोन 9 हजार पेक्षा कमी मध्ये उपलब्ध होणार आहे. हा हॅन्डसेट 5G SA (standalone) सपोर्ट आहे. 5G NSA (non-standalone) ला सपोर्ट नाही.
स्मार्टफोनच्या लॉन्चपूर्वी फ्लिपकार्ट वर देखील सुरू करण्यात आलेल्या मायक्रोसाईट द्वारा या फोनची पहिली झलक समोर आली आहे. Poco M7 Pro 5G हा 6.67-inch full-HD+ display आणि 120Hz adaptive refresh rate आणि 92.02 percent screen-to-body ratio तसेच 2,100nits peak brightness आणि HDR 10+ support आहे. डिस्प्ले मध्ये Corning Gorilla Glass 5 protection,आहे. TUV triple certification,आणि SGC eye care certification देखील आहे. या फोन मध्ये ईन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.
Poco C75 5G मध्ये Snapdragon 4s Gen 2 SoC असणार आहे. त्यासोबत 4GB RAM आहे. या हॅन्डसेट मध्ये 4GB of Turbo RAM आणि storage 1TB पर्यंत micro SD card slot च्या मदतीने वाढवता येऊ शकतं. Poco C series चा फोन गोलाकार कॅमेरा सह आहे.
मागील लीक्सच्या माहितीनुसार, Poco C75 5G मध्ये 6.88-inch HD+ display आहे आणि 120Hz refresh rate आहे. यामध्ये 5,160mAh बॅटरी आहे आणि 18W charging support आहे. या हॅन्डसेट मध्ये 50-megapixel primary sensor सह ट्रीपल रेअर कॅमेरा युनिट असण्याचा अंदाज आहे.
जाहिरात
जाहिरात