Poco M7 Pro 5G, Poco C75 5G भारतात 17 डिसेंबरला होणार लॉन्च; किंमत 9 हजार पेक्षांही कमी, पहा फीचर्स

Poco M7 Pro 5G, Poco C75 5G भारतात 17 डिसेंबरला होणार लॉन्च; किंमत 9 हजार पेक्षांही कमी, पहा फीचर्स

Photo Credit: Poco

Poco M7 Pro 5G मध्ये 6.67-इंच AMOLED स्क्रीन असेल

महत्वाचे मुद्दे
  • Poco M7 Pro 5G मध्ये असणार 2,100 nits AMOLED display
  • Poco C75 5G मध्ये Sony camera sensor असणार
  • Poco M7 Pro 5G आणि Poco C75 5G भारतात 17 डिसेंबरला होणार लॉन्च
जाहिरात

Poco M7 Pro 5G आणि Poco C75 5G हे स्मार्टफोन भारतामध्ये 17 डिसेंबरला लॉन्च होण्याच्या तयारीत आहे. भारतीय बाजारपेठांमध्ये हे स्मार्टफोन लॉन्च होण्यापूर्वी कंपनीने या फोनच्या फीचर्सबद्दल माहिती दिली आहे. त्यामध्ये फोनच्या कॅमेरा, डिस्प्ले ची माहिती दिली आहे. Poco M7 Pro 5G या फोनमध्ये 50-megapixel primary camera आहे. तो Sony sensor सोबत येणार आहे. तर Poco C75 5G हा C series चा पहिला फोन आहे ज्यामध्ये Xiaomi's HyperOS चा वापर करण्यात आला आहे.

Poco M75 Pro 5G, Poco C75 5G ची स्पेसिफिकेशन काय?

Poco India ने X वर शेअर केलेल्या माहितीनुसार, Poco M7 Pro 5G मध्ये 6.67-inch full HD+ AMOLED display असणार आहे तर 120Hz adaptive refresh rate आणि peak brightness of 2,100 nits असणार आहे. या हॅन्डसेट मध्ये TUV triple certification, SGS eye care display certification असणार आहे. हा फोन 92.02 percent screen-to-body ratio सह आहे.

फोनचा कॅमेरा पाहता, त्यामध्ये ड्युअल रेअर कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये 50-megapixel Sony LYT-600 camera आणि optical image stabilisation आहे. त्यामध्ये multi-frame noise reduction आणि four-in-one pixel binning आहे. यासोबतच फोनमध्ये in-sensor zoom आहे. सोबतच super resolution technology आहे. या फोनमध्ये 300 percent सूपर व्हॅल्त्यूम, dual stereo speakers, Dolby Atmos support आहे. सोबतच 3.5mm headphone jack, Corning Gorilla Glass 5 protection, आणि in-display fingerprint sensor आहे.

कंपनी कडून Poco C75 चा 5G variant हा या सीरीज मधील HyperOS platform वरील पहिला फोन असल्याचं म्हटलं आहे. हा फोन 9 हजारांपेक्षा कमी किंमतीचा आहे. यामध्ये Sony sensor आहे. हा फोन segment-first आहे. आगामी स्मार्टफोन मध्ये Qualcomm ची Snapdragon 4s Gen 2 chipset असणार आहे. ज्यात 4nm architecture आहे. या फोन मध्ये चीपसेट ही 8GB of RAM आणि 1TB of expandable storage सोबत जोडलेली आहे.

Poco च्या माहितीनुसार, या फोनमध्ये OS दोन वर्षांसाठी आणि security updates चार वर्षांसाठी मिळणार आहे. हॅन्डसेट मधील अन्य फीचर्सचा विचार करता त्यामध्ये side-mounted fingerprint sensor आहे. tap gestures, dual-SIM support आणि MIUI dialler आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »