Poco X7 Pro 5G, Poco X7 Pro 5G मध्ये पहा फीचर्स काय

बेस Poco X7 5G मध्ये 6.67-inch 120Hz AMOLED 1.5K display असण्याचा अंदाज आहे

Poco X7 Pro 5G, Poco X7 Pro 5G मध्ये पहा फीचर्स काय

Photo Credit: Poco

Poco X7 5G (डावीकडे) आणि Poco X7 Pro 5G (उजवीकडे) काळ्या आणि पिवळ्या पर्यायांमध्ये दिसत आहेत

महत्वाचे मुद्दे
  • Poco X7 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 8400-Ultra SoC चीपसेट चा अंदाज
  • Poco X7 5G बेस मॉडेल हे सिल्वर आणि हिरव्या रंगामध्ये
  • Poco X7 5G series मध्ये 50-megapixel main camera असू शकतो
जाहिरात

Poco X7 5G series भारतामध्ये 9 जानेवारी दिवशी लॉन्च केला जाणार आहे. या फोनच्या लाईनअप मध्ये base Poco X7 5G आणि Poco X7 Pro 5G व्हेरिएंटचा समावेश आहे. भारतामध्ये हा फोन Flipkart च्या माध्यमातून विक्रीसाठी खुला होणार आहे. फोन कंपनीकडून या आगामी दोन्ही फोनची डिझाईन समोर आणण्यात आली आहेत. या फोनच्या चीपसेटचे डिटेल्स देखील समोर आले आहेत. यापूर्वीच समोर आलेल्या फोनच्या काही तपशीलांमध्ये Poco X7 5G series handsets मध्ये काय फीचर्स असतील याची माहिती देण्यात आली आहे.

Poco X7 5G आणि Poco X7 Pro 5G च्या डिझाईन ची माहिती फोन कंपनीने X वरील पोस्ट मध्ये दिली आहे. फ्लिपकार्टच्या मायक्रोसाईट वर देखील त्याची माहिती दिली आहे. बेस व्हेरिएंट मध्ये चौकोनी रेअर कॅमेरा मॉड्युल आहे. तर प्रो मॉड्युल मध्ये गोळीच्या आकाराचा गोलाकृती कॅमेरा आहे. दोन्ही फोन हे ब्रॅन्डच्या सिग्नेचर कलर्स काळा आणि पिवळा रंगांमध्ये उपलब्ध आहेत.

फोन कंपनीच्या दुसर्‍या एका पोस्ट मध्ये Poco X7 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 8400-Ultra SoC चीपसेट असेल अशी माहिती देण्यात आली आहे. यापूर्वीच्या लिक्स नुसार, vanilla model मध्ये MediaTek Dimensity 7300-Ultra chipset असण्याचा अंदाज आहे. लीक्स मधील माहितीनुसार, Poco X7 5G बेस मॉडेल हे सिल्वर आणि हिरव्या रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. प्रो व्हेरिएंट हे दोन रंगांमध्ये म्हणजेच काळा आणि हिरव्या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Poco X7 5G series मध्ये 50-megapixel main camera असू शकतो असा अंदाज टीझर मधून येतो. तर प्रो व्हर्जन मध्ये Sony IMX882 sensor असू शकतो. व्हेनिला ऑप्शन हा 20-megapixel selfie shooter सह येईल तर हा हॅन्डसेट IP68-rated आहे.

बेस Poco X7 5G मध्ये 6.67-inch 120Hz AMOLED 1.5K display असण्याचा अंदाज आहे. सोबतच फोनमध्ये Corning Gorilla Glass Victus 2 protection आहे. प्रो मॉडेल मध्ये 6.67-inch CrystalRez 1.5K AMOLED screen आहे. Poco X7 आणि X7 Pro मध्ये 5,110mAh आणि 6,000mAh बॅटरीज आहेत. तर अनुक्रमे 45W आणि 90W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Lava Agni 4 लवकरच लाँच होणार, सर्टिफिकेशन साइटवर बॅटरी स्पेसिफिकेशन्सची माहिती
  2. Lava Probuds N33 नेकबँड भारतात लॉन्च; IPX5 रेटिंग, फास्ट चार्जिंग आणि 30dB ANC फीचर्स सोबत येणार
  3. Galaxy S26 सीरिजचा कॅमेरा होणार आणखी पॉवरफूल; कॅमेरा स्पेसिफिकेशन्सनी वाढवली उत्सुकता
  4. OnePlus 15 सीरिजसाठी OP Gaming Core टेक्नॉलॉजी लाँच; पहा काय आहे खास?
  5. iQOO Neo 11 लवकरच होणार उपलब्ध; 35K मध्ये मिळणार फ्लॅगशिप फीचर्स?
  6. Flipkart वर दिसला Realme GT 8 Pro; भारतात लवकरच करता येणार खरेदी
  7. Vivo X300 आणि X300 Pro अधिकृतपणे आला ग्लोबल मार्केटमध्ये; भारतातील लॉन्च लवकरच
  8. iQOO 15 भारतात लवकरच लॉन्च होणार; Geekbench लिस्टिंगमधून समोर आले महत्त्वाची फीचर्स
  9. Realme GT 8 Pro भारतात 20 नोव्हेंबरला लॉन्च होणार; जाणून घ्या खास फीचर्स
  10. Amazon ने भारतात लॉन्च केला Fire TV Stick 4K Select, Vega OS सह येणार खास फीचर्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »