Realme 14 Pro+ 5G मध्ये अजून एक व्हेरिएंट; जाणून घ्या खास बात

Realme 14 Pro+ 5G मध्ये अजून एक व्हेरिएंट; जाणून घ्या खास बात

Photo Credit: Realme

Realme 14 Pro+ 5G बिकानेर पर्पल, पर्ल व्हाइट आणि स्यूडे ग्रे शेड्समध्ये येतो

महत्वाचे मुद्दे
  • Realme 14 Pro+ 5G च्या 12GB + 512GB variant ची किंमत Rs. 37,999
  • नव्या स्टॉरेज व्हेरिएंटचा फोन फोन 6 मार्चपासून विक्रीसाठी खुला असणार
  • हा फोन Pearl White आणि Suede Grey सोबतच Bikaner Purple रंगामध्येही उपल
जाहिरात

Realme 14 Pro+ 5G भारतामध्ये Realme 14 Pro 5G सोबतच जानेवारी महिन्यात लॉन्च झाला आहे. सुरूवातीला हा फोन 3 रॅम आणि स्टोरेज कॉन्फ्युगरेशन मध्ये उपलब्ध होता. यामध्ये 8GB+128GB, 8GB+256GB, आणि 12GB+256GB चा समावेश आहे. आता कंपनीकडून 512GB variant देखील आणला आहे. Realme 14 Pro+ 5G मध्ये Snapdragon 7s Gen 3 SoC, असणार आहे तर 6,000mAh battery,50-megapixel triple rear camera unit आणि periscope shooter असणार आहे.

Realme 14 Pro+ 5G ची भारतामधील उपलब्धता, किंमत

Realme 14 Pro+ 5G च्या 12GB + 512GB variant ची किंमत Rs. 37,999 आहे. हा फोन Pearl White आणि Suede Grey रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा स्टोरेजच्या नव्या पर्यायासह उपलब्ध फोन 6 मार्चपासून विक्रीसाठी खुला असणार आहे. Flipkart, Realme India e-store आणि काही निवडक रिटेल स्टोअर मध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे. ग्राहकांना हा फोन विक्रीच्या पहिल्या दिवशी 3000 रूपये सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध होणार आहे.

Realme 14 Pro+ 5G ची भारतामधील किंमत Rs. 29,999 आहे. हा फोन 8GB + 128GB पर्यायाचा असणार आहे. पण यासोबतच 8GB + 256GB आणि 12GB + 256GB व्हेरिएंट उपलब्ध असणार आहे. त्यांची किंमत अनुक्रमे Rs. 31,999 आणि Rs. 34,999 असणार आहे. हा फोन Pearl White आणि Suede Grey सोबतच Bikaner Purple रंगामध्येही उपलब्ध असणार आहे.

Realme 14 Pro+ 5G ची फीचर्स

Realme 14 Pro+ 5G फोनमध्ये 6.83-inch 1.5K (1,272×2,800 pixels) AMOLED display आहे. फोनमध्ये Corning Gorilla Glass 7i protection आहे. या फोनमध्ये 4nm octa-core Snapdragon 7s Gen 3 SoC आहे. जी 12GB of RAM आणि 512GB of onboard storage सोबत जोडलेली आहे. या फोनमध्ये Android 15-based Realme UI 6.0. असणार आहे.

फोनमधील कॅमेरा पाहता Realme 14 Pro+ मध्ये 50-megapixel 1/1.56-inch Sony IMX896 primary rear sensor आहे. 8-megapixel ultra-wide shooter आणि 50-megapixel Sony IMX882 periscope camera आहे. सेल्फीसाठी 32-megapixel sensor चा फ्रंट कॅमेरा आहे. Realme 14 Pro+ 5G मध्ये 80W वायर्ड फास्ट-चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी आहे. सिक्युरिटीसाठी, त्यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Honor चा नवा टॅबलेट Pad X9a आला बाजारात; पहा फीचर्स काय?
  2. iOS च्या लाइव्ह फोटो प्रमाणे Android वरही दिसणार Motion Photos; WhatsApp करतेय प्रयत्न
  3. Vivo V50 Lite 5G मध्ये काय खास? जाणून घ्या सविस्तर स्पेसिफिकेशन्स
  4. Infinix Note 50 Pro+ 5G मध्ये काय खास? घ्या जाणून स्पेसिफिकेशन्स
  5. Oppo F29 Pro 5G, Oppo F29 5G मध्ये काय आहे खास? जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स इथे
  6. Reliance Jio कडून काही प्लॅन्स वर मोफत IPL cricket streaming पाहता येणार; जाणून घ्या अपडेट्स
  7. Realme P3 Ultra 5G, Realme P3 5G ची प्री बुकिंग सुरू; पहा कुठे खरेदी?
  8. Simple Energy ची नवी इलेक्ट्रिक स्कूटर आली बाजरात; पहा फीचर्स, किंमत
  9. Lenovo Idea Tab Pro मध्ये MediaTek Dimensity 8300 SoC, Quad JBL Speakers; पहा अन्य फीचर्स, किंमत काय?
  10. Motorola Edge 60 Fusion च्या अपडेट्स बद्दल समोर नवे लीक्स; घ्या जाणून
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »