Photo Credit: Realme
Realme GT 7T सोबत Realme GT 7 चे अनावरण केले जाईल
Realme GT 7T हा स्मार्टफोन भारतासह जगभरात 27 मे दिवशी लॉन्च होण्याच्या तयारी मध्ये आहे. फोन लॉन्च होण्यापूर्वी नवीन GT सिरीज स्मार्टफोनची डिझाईन कथित रेंडरद्वारे ऑनलाइन लीक झाली आहे. लीक झालेल्या रेंडरवरून आपल्याला फोन कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे याची झलक देखील पहायला मिळते. Realme GT 7T मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.8-इंचाचा डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. तो MediaTek Dimensity 8400 Max प्रोसेसरवर चालेल असे म्हटले जाते. फोनमध्ये 120W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी असण्याची माहिती देण्यात आली आहे.Realme GT 7T चे डिझाईन झाले लीक,Tipster Sudhanshu Ambhore (@Sudhanshu1414) ने दिलेल्या माहितीनुसार, Realme GT 7T चा फोटो X वर शेअर करण्यात आला आहे. फोन सार्या बाजूने दाखवण्यात आला आहे. हा फोन काळा, निळा आणि पिवळ्या रंगामध्ये उपलब्ध आहे. पिवळ्या रंगाच्या व्हेरिएंटमध्ये मागील बाजूस काळ्या पट्टे आहेत, ज्यामुळे तो एक स्पोर्टी लूक देतो. हँडसेटमध्ये चौकोनी आकाराचा कॅमेरा मॉड्यूल आहे ज्यामध्ये दोन सेन्सर आणि रिंग सारखा एलईडी फ्लॅश आहे. डिस्प्लेमध्ये मध्यभागी एक छिद्र-पंच कटआउट आणि अरुंद बेझल आहेत.
पोस्टमध्ये Realme GT 7T च्या संभाव्य स्पेसिफिकेशन्सचा समावेश आहे. हा फोन Android 15-आधारित Realme UI 6.0 आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.8-inch (1,280x2,800 pixels) AMOLED डिस्प्लेसह येईल असे म्हटले जाते. हा फोन MediaTek Dimensity 8400 Max चिपसेटवर चालू शकतो.
फोनचा कॅमेरा पाहता Realme GT 7T मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे ज्यामध्ये f/1.8 अपर्चर आणि OIS सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर आणि f/2.2 अपर्चरसह 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा असेल. सेल्फीसाठी, त्यात f/2.4 अपर्चरसह 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. तो IP68-रेटेड बिल्डसह येईल असे म्हटले जाते.
Realme GT 7T मध्ये कनेक्टिव्हिटी साठी Bluetooth 6.0, NFC, USB Type-C port, आणि Wi-Fi 6 आहे. फोनचा आकार 162.42 x 75.97 x 8.25mm आहे. फोनचं वजन 202 ग्राम आहे. Realme ने आधीच पुष्टी केली आहे की GT 7T मध्ये 120W वायर्ड चार्जिंगसह 7,000mAh बॅटरी असेल.
जाहिरात
जाहिरात