Photo Credit: Realme
Realme Narzo 70 Curve लवकरच अधिकृतपणे curved screen सह येणार आहे. Realme कडून अद्याप कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही. सध्या ऑनलाईन वर Narzo 70 series च्या फोनची RAM, storage आणि रंगांच्या पर्यायाची माहिती लीक झाली आहे. Realme Narzo 70 Curve मध्ये 4 रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट आहेत तर फोन 2 रंगांमध्ये येणार आहे. फोनच्या लॉन्च टाईम आणि किंमती बद्दल माहिती दिल्यानंतर आता या नव्या चर्चांना सुरूवात झाली आहे. Realme ची Narzo 70 series मध्ये आता 4 व्हेरिएंट आहेत. ते चारही मॉडेल्स MediaTek Dimensity chipsets सह आहेत.
91Mobiles,च्या माहितीनुसार, फोन मध्ये असलेली रॅम, स्टोरेज, रंग समोर आले आहेत. यामध्ये 8GB + 128GB, 8GB + 256GB, 12GB + 256GB, आणि 12GB + 512GB व्हेरिएंट्स उपलब्ध होऊ शकतात. Realme Narzo 70 Curve मध्ये deep violet आणि deep space titanium रंगांचा पर्याय असण्याचा अंदाज आहे. यांचा मॉडेल नंबर RMX3990 असण्याचा अंदाज आहे.
Realme कडून अद्याप नव्या Narzo series phone ची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पुढील महिन्यापर्यंत हा फोन अधिकृतपणे समोर येण्याचा अंदाज आहे. या फोनची किंमत 15 ते 20 हजारच्या दरम्यान असण्याचा अंदाज आहे. Realme Narzo 70 series मधील Realme Narzo 70, Narzo 70 Pro, Narzo 70x, आणि Narzo 70 Turbo 5G प्रमाणेच या फोनची स्पेसिफिकेशन असण्याचा अंदाज आहे.
Realme Narzo 70 मध्ये MediaTek Dimensity 7050 5G SoC आहे. Narzo 70x मध्ये MediaTek Dimensity 6100+ SoC असण्याचा अंदाज आहे. तर Realme Narzo 70 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 7050 SoC असण्याचा अंदाज आहे. Narzo 70 Turbo 5G मध्ये Dimensity 7300 Energy 5G SoC आलेला आहे. चारही मॉडेल्स मध्ये 50-megapixel primary rear camera आणि 5,000mAh बॅटरी आहे.
जाहिरात
जाहिरात